अवघ्या २३ दिवसांत शहराचे फुप्फुस झाले करडे

अवघ्या २३ दिवसांत शहराचे फुप्फुस झाले करडे

जंगली महाराज रस्त्यावरची हवा होती प्रदूषित

पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानासमोर बसवलेले हवेचे प्रदूषण मोजणारे स्वयंचलित कृत्रिम फुप्फुस अवघ्या २३ दिवसांत करड्या रंगाचे झाले आहे. इतक्या दिवसांत जंगली महाराज रोडवरील हवेची गुणवत्ता ही ८० ते १०० च्या घरातच म्हणजे प्रदूषित प्रकारातच गणली गेली.

महापालिका व परिसर संस्थेच्या वतीने शहरातील हवा किती प्रदूषित झाली आहे, हे मोजणारे शहराचे प्रातिनिधिक स्वयंचलित फुप्फुसच जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यानासमोर दि. २७ डिसेंबर रोजी काही कालवधीसाठी. बसवले होते. सोमवारी ते काढण्यात आले. या फुप्फुसाच्या डिजिटल मीटरवर शहरातील हवेचे प्रदूषण मोजले गेले. यात प्रामुख्याने वाहन इंधन ज्वलनातून बाहेर पडणारे सूक्ष्म धुलिकणं (पीएम १०) आणि पीएम २.५ या अतिसूक्ष्म धुलिकणांची नोंद घेतली गेली. या डिजिटल यंत्रात २३ दिवसांत जंगली महाराज रोडवरील पांढरेशुभ्र फुप्फुस करड्या रंगात परिवर्तित झाले आहे. शुद्ध हवा माझा अधिकार, असे घोषवाक्य लिहिलेले फुप्फुस पाहण्यासाठी, याची पाहणी करण्यासाठी शहरातील सायकल चालवणारे तरुण, तसेच शहरातील नागरिकांनी भेट दिली. त्यावेळी परिसर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना या यंत्राविषयी माहिती दिली. पथनाट्याच्या स्वरुपातूनदेखील या ठिकाणी प्रदूषणाची माहिती देण्यात येत होती, मात्र शहरातील कोरोनाची परिस्थिती पाहता या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून हे यंत्र सोमवारी पालिकेने सोमवारी काढले. शहरातील २२ विविध गटांतील लोकांनी या ठिकाणी भेट दिली, त्यावेळी हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते, याची माहिती जिज्ञासूंना गेले २३ दिवस सतत देण्यात आली.

स्वारगेट परिसर सर्वात प्रदूषित
हे यंत्र प्रातिनिधिक स्वरुपात शहरवासीयांच्या प्रबोधनासाठी महापालिका व परिसर संस्थेच्या पुढाकारातून बसवण्यात आले होते. शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस वाहनांतून निघणाऱ्या धुलिकणांमुळे किती खराब होत आहे हेच या यंत्राने दाखवले. हे यंत्र बसवण्याआधी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शहरातील स्वागरेट परिसर •सर्वात प्रदुषित असून तेथे जमणाऱ्या प्रचंड वाहनांच्या गर्दीमुळे तेथील हवा ६७ टक्के प्रदुषित झाली आहे. तर नळस्टॉप भागातील हवा १३ टक्के इतकी प्रदुषित झाल्याचे अहवालात म्हटले होते. हे यंत्र जर स्वारगेट भागात बसवले असते तर पूर्ण काळे झाले असते. शहरात शिवाजीनगर, विद्यापीठ रोड, भूमकर चौक, कात्रज रस्ता या ठिकाणीही हवेची गुणवत्ता सतत प्रदुषित या प्रकारत असते. या यंत्रामुळे नागरिकांना हवेची गुणवत्ता म्हणजे काय, ती कशी मोजतात याची माहिती झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *