राष्ट्राच्या प्रगतीत प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण

राष्ट्राच्या प्रगतीत प्रत्येकाचे योगदान महत्वपूर्ण

नि. कर्नल सदानंद साळुंके; लायन्स क्लबच्या कॅबिनेट अधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
पुणे : “भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आहेत. या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपले योगदान दिले. हाच वारसा पुढे स्वतंत्र भारताच्या संरक्षणासाठी देशाच्या तीनही दलांनी पुढे नेला आहे. अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारताच्या प्रगतीसाठी लायन्स क्लबसारख्या सेवाभावी संस्था भरीव योगदान देत आहेत. शंभर वर्षांचा हा सेवाभाव यापुढेही असाच राहायला हवा,” असे प्रतिपादन वीरचक्र पुरस्कारप्राप्त निवृत्त कर्नल सदानंद साळुंके यांनी केले.

द इंटरनॅशल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२ आयोजित ‘उमंग’-कॅबिनेट अधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन ए. पी. सिंग यांच्या हस्ते पदग्रहण पार पडले. लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन हेमंत नाईक, उपप्रांतपाल लायन राजेश कोठावळे, निमंत्रित प्रांतपाल लायन सुनील सुतार, माजी प्रांतपाल सीए अभय शास्त्री, ‘उमंग’चे संयोजक लायन चंद्रहास शेट्टी व लायन द्वारका जालान, कॅबिनेट सचिव लायन निखिल शाह, कॅबिनेट खजिनदार लायन शरद पवार, ‘उमंग’चे समन्वयक लायन शाम खंडेलवाल, लायन परमानंद शर्मा, जनसंपर्क अधिकारी लायन राजेंद्र गोयल आदी उपस्थित होते.

ए. पी. सिंग म्हणाले, “लायन्स क्लब हे सेवाकार्य करण्यासाठीचे अतिशय चांगले व्यासपीठ आहे. आपण जी सेवा करतो आहोत, ती मनापासून करायला हवी. वंचितांना, गरजूना मदत करतेवेळी त्यांच्या मनात मदतीचा नाही, तर आपलेपणाचा भाव निर्माण व्हायला हवा. त्यासाठी आपण करत असलेल्या सेवाकार्यात एकरूप झाले पाहिजे. निःस्वार्थ भावनेने सेवा व्हायला हवी.”

लायन हेमंत नाईक म्हणाले, “महिला आणि मुलांसाठी वर्षभर आपल्याला काम करायचे आहे. युवाशक्ती देशाचे भवितव्य असून, त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि आहार देण्यासाठी आपण करूया. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी आणि महिलांना सुरक्षित व चांगले वातावरण देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.”

यावेळी सह्याद्री लायन या मासिकाचे, लायन्स क्लबच्या डिरेक्टरीचे आणि न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. शाम खंडेलवाल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. द्वारका जालान यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रहास शेट्टी यांनी आभार मानले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *