राष्ट्रनिर्माणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांकडून धैर्याचा आदर्श घ्यावा : शीला ओक

राष्ट्रनिर्माणासाठी बलिदान देणाऱ्या वीरांकडून धैर्याचा आदर्श घ्यावा : शीला ओक

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
 
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये (Suryadatta Group of Institute) ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत कोरोना नियमांचे पालन करत वैविध्यपूर्ण पोशाखात विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाला साजेशी अशी सजावट कॅम्पसमध्ये करण्यात आली होती. सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या प्राचार्य व संचालक शीला ओक (Sheila Oak) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, दीपक सिंग, प्रा. उल्हास चौधरी, रोहित संचेती, गौरव शर्मा, बाटु पाटील, नितीन कामठेकर यांच्यासह विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
शीला ओक म्हणाल्या, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrutmahotsav), तर प्रजासत्ताकाची (Republic Day) ७३ वर्षे साजरी करत असताना राष्ट्राच्या उभारणीत ज्यांनी बलिदान (Sacrifice) दिले आहे, त्या सर्व शूरवीरांना आपण वंदन (Salute) केले पाहिजे. आपण सर्वजण कोरोनाच्या (COVID-19) कठीण परिस्थितीतून जात आहोत. स्वतःसह इतरांची काळजी घेऊन या संकटाचा धैर्याने सामना करण्याची गरज आहे. सीमेवरील सैनिक दाखवत असलेल्या धैर्याचा आदर्श घेत आपणही या संकटाचा धैर्याने सामना केला पाहिजे. आपापसांत प्रेमभाव जपला पाहिजे.”
 
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रमात सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. सूर्यदत्त नॅशनल स्कुलची (Suryadatta National School) रुणझुण शहा हिने इंग्रजीतून, तर शाश्वत शेखर याने हिंदीतून भाषण केले. अश्विनी देशपांडे हिने सूत्रसंचालन केले. राम्या श्री हिने आभार मानले. 
 
‘सूर्यदत्त’कडून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना
रुजवण्याचे होते काम : प्रा. डॉ. संजय चोरडिया
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया (Sanjay Chordiya), संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, किरण राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सर्वाना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सूर्यदत्त परिवार राष्ट्राच्या सेवेत सतत अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी सातत्याने उपक्रमांचे आयोजन करण्यात येत, पुढील काळात त्यांनी राष्ट्राभिमुख कार्य करावे, याची शिकवण दिली जात आहे. सूर्यदत्ता परिवारातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन जगभर प्रवास करणारे विद्यार्थी आमचे राष्ट्रदूत आहेत. शांतता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा याचे ते प्रतीक आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *