‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

सूर्यदत्त व सूर्यभारत परिवाराचा सेवाभिमुख उपक्रम; पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, वारी, पत्रकार कल्याणासह विविध क्षेत्रांवर भर

पुणे, ता. २६ : सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजतर्फे ‘६५ वर्षे – ६५ समाजोपयोगी उपक्रम’ हा व्यापक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, दिव्यांग कल्याण, ग्रामीण विकास, आषाढी वारीतील वारकऱ्यांची सेवा, महिला सक्षमीकरण, पत्रकार कल्याण आणि गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार आहेत.

“वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजाचे ऋण फेडण्याची संधी आहे,” या संकल्पनेतून हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सूर्यदत्त परिवाराने सांगितले. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत ६५ वृक्षांची लागवड, औषधी वनस्पती संवर्धन, प्लास्टिकमुक्ती अभियान, पाणी बचत जनजागृती, ई-कचरा संकलन, सौर ऊर्जा वापराविषयी मार्गदर्शन, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आणि ६,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात येणार आहे.

समाजोपयोगी उपक्रमांत गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप, आदिवासी विद्यार्थ्यांना सायकली, बेघर नागरिकांना चादरी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, अनाथाश्रम व वृद्धाश्रम सेवा, फूड बँक, क्लोदिंग बँक, नॉलेज बँक, गोसेवा, दिव्यांग सहाय्य आणि योगदान-दान अभियान राबविण्यात येणार आहेत. आषाढी वारी निमित्त ६५ दिंड्यांतील वारकऱ्यांना रेनकोट, प्रथमोपचार पेट्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती सुविधा आणि पायपीट करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आरोग्य क्षेत्रात मेगा रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा, महिला व बालकांसाठी आरोग्य शिबिरे, जेनेरिक औषधांविषयी मार्गदर्शन, सीपीआर प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्यावरील व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. शैक्षणिक उपक्रमांत डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा जनजागृती, आर्थिक साक्षरता, बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण, एएनएम अभ्यासक्रमासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती, मोफत करिअर मार्गदर्शन, एमपीएससी-यूपीएससी मार्गदर्शन आणि ६५ तासांचा इंग्रजी संभाषण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.

महिला आणि युवकांच्या स्वावलंबनासाठी हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, शिवणकला, ब्युटी अँड वेलनेस, अन्न प्रक्रिया प्रशिक्षण, स्टार्टअप मार्गदर्शन तसेच स्वयंरोजगारासाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्याचे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षीच्या उपक्रमांमध्ये पत्रकार कल्याणालाही विशेष स्थान देण्यात आले आहे. गरजू पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचे पदवीपर्यंतचे शैक्षणिक पालकत्व, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना आपत्कालीन वैद्यकीय मदत, गुणवंत पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांच्या पाल्यांसाठी विविध स्पर्धा, आधुनिक माध्यम तंत्रज्ञानावर राज्यस्तरीय अधिवेशन आणि पत्रकारांसाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

याशिवाय ग्रामीण विकास, दिव्यांग पुनर्वसन, कौशल्य विकास, स्टार्टअप मार्गदर्शन आणि समाजहिताचे अनेक उपक्रम सूर्यदत्तच्या विविध संस्थांमार्फत राबविण्यात येणार आहेत. या “सेवेच्या उत्सवा”त विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सूर्यदत्त आणि सूर्यभारत परिवाराने केले आहे. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सौ. सुषमा संजय चोरडिया यांच्या समाजाभिमुख विचारांना प्रतिसाद देत या लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये नागरिकांनी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.