वनाझ परिवार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उत्साहात संपन्न

वनाझ परिवार विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उत्साहात संपन्न

पुणे: कोथरूड येथे २३डिसेंबर २०२४ वार सोमवार यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. यावर्षी स्नेहसंमेलनाची भारताची विविध संस्कृती ने परिपूर्ण अशी ‘लोकनृत्य’ ही थीम घेण्यात आली होती. यामध्ये कोळी नृत्य, कश्मीरी नृत्य, भांगडा नृत्य, बाल्या नृत्य, शेतकरी नृत्य, आदिवासी नृत्य, संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराय, अंबाबाईचा जोगवा, पोतराज, महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज तसेच संविधान दिन, यावर आधारित नाटक घेऊन विद्यार्थ्यांचे कलागुण सादर करण्यात आले. पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक व उच्च प्राथमिक विभाग (इयत्ता पहिली ते आठवी) विद्यार्थी सहभागी होते.

आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय अपर्णा कुलकर्णी मॅडम यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मातोश्री उमाताई खांडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे विश्वस्त माननीय श्री अ.ल. देशमुख सर, अध्यक्षा माननिय रजनीताई दाते, शाळेचे सचिव श्री माननीय वाय के कदम सर , खजिनदार श्री माननीय सकपाळ सर तसेच वनाझ कंपनीचे युनियन पदाधिकारी तसेच सर्व विभागाचे मा.मुख्याध्यापिका शितल देशमुख, मुख्याध्यापिका अनिता दारवटकर ,उपमुख्याध्यापिका नीता जाधव , पर्यवेक्षिका माया झावरे व कांचन गोपाळे उपस्थित होते…

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी चव्हाण व अर्चना जाधव यांनी केले तर अध्यक्षीय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बालवाडी विभागाच्या शिक्षिका शुभांगी पासलकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सूत्रसंचालकांनी मानले.यासाठी लागणारे सर्वांचे मार्गदर्शन खूप मोलाचे असते. सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवक, तसेच पालक प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुनियोजित व उत्कृष्टपणे झाला.. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख मंदाकिनी लोहार ,अश्विनी चव्हाण ,सुनिता जपे , सोनाली ताई यांनी सर्व विभागाचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केले.. वरील सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य कायमच सोबत असते आणि म्हणूनच कोणताही कार्यक्रम सूत्रबद्ध व उत्कृष्ट होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *