बारावीच्या परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

बारावीच्या परीक्षेत ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त पब्लिक स्कुल आणि सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उल्लेखनीय यश मिळवत स्थापनेपासून असलेली गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली. १०० हुन अधिक विद्यार्थ्यांना ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
 
सूर्यदत्त पब्लिक स्कुलमध्ये विज्ञान शाखेत गार्गी मनीष मोघे हिने ९५ टक्के गुण मिळवून प्रथम, उर्वी सुमित गुर्जर हिने ९४.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर झोया अजय झव्हेरी हिने ९२.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत अंजली भूपेंद्र टाक हिने ९४.५० टक्के गुण मिळवत प्रथम, आशेषा चितवन हुमद हिने ९२ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर दिपाली सोहम देशपांडे आणि सई मिलिंद सिनकर यांनी ९०.८३ टक्के  गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत सावित्री खन्नन हिने ९५.६७ टक्के गुणांसह प्रथम, विधी संजय भारांबे हिने ९४.८३ टक्के गुणांसह द्वितीय व अनन्या राहुल चौधरी हिने ९४.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. 
 
सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत स्वराली किरण कुलकर्णी हिने ९१ टक्के गुणांसह प्रथम, अर्पित मकरंद विभुते याने ८६.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर सिद्ध संदीप गुहा याने ८५.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत आयुषी उपेंद्र परदेशी हिने ९३.३३ टक्के गुणांसह प्रथम, सानिका निशीकांत देशपांडे हिने ८८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर आर्या अभिजित महाजन हिने ८८.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत शांभवी आनंद टेंबुलकर हिने ९२.६७ टक्के गुणांसह प्रथम, भूमी सागर साबू हिने ९२.५० टक्के गुणांसह द्वितीय व मधुरा अभय अंभोरकर हिने ९१.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. एमसीव्हीसी शाखेत श्रावणी गोविंद मोदी हिने ७५ टक्के, चिन्मय आनंद पाटील याने ७२.८३ टक्के, तर यशोधन राजेश खुळे याने ७०.६७ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.
 
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समूह प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना लवकरच सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.
 
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्राध्यापक, कर्मचारी यांची मेहनत घेतली. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास, प्रोत्साहन, अतिरिक्त मार्गदर्शनासह अवांतर गोष्टी दिल्या. या दोन वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत जीवनाची मूल्येही शिकविण्यात आली. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय  क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *