पथनाट्यातून मासिक पाळीच्या आरोग्याची जनजागृती

पथनाट्यातून मासिक पाळीच्या आरोग्याची जनजागृती

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन विशेष (World Menstrual Hygiene Day)
 

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (Aditya Birla Education Trust) संचालित ‘उजास’ (Ujaas) प्रकल्पाचा उपक्रम; अद्वैतेषा बिर्ला यांचा पुढाकार

 
पुणे : मासिक पाळीभोवतीचा कलंक पुसण्यासह मासिक पाळीचे आरोग्य, स्वच्छता याबद्दल मोकळेपणाने संभाषण याविषयी जनजागृती करणाऱ्या पथनाट्याचे (Street Play) सादरीकरण करण्यात आले. उद्या (शनिवारी) जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा होत असताना आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम ‘उजास’ने पुण्यात प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण केले.
 

‘ब्रेकिंग द सायलेन्स : लेट्स नॉर्मलाईज पीरियड्स’ (Breaking the Silence : Lets Normalized Periods) या शीर्षकाचे हे पथनाट्य पिंपरी व पुणे शहरात सहा ठिकाणी सादर झाले. पिंपरी येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या परिसरात याचा शुभारंभ झाला. ‘साद प्ले ग्रुप’ने (Saad Play Group) शहरातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंसहायता गट, स्वारगेट बस डेपो, जंगली महाराज रस्ता, डी. वाय. पाटील विद्यापीठ अशा विविध ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थीडॉक्टर आणि विविध घटकांशी संबंधित लोकांनी पथनाट्याचे सादरीकरण अनुभवले. 
 
पथनाट्यांसोबतच, ‘उजास’ने वर्षभर जनजागृतीसाठी भिंतीवरील रंगकाम, दृष्टिहीनांसाठी कार्यशाळा आदी उपक्रम राबवले आहेत. मासिक पाळीच्या आरोग्याचे महत्त्वयोग्य स्वच्छतेच्या पद्धती आणि प्रचलित गैरसमज दूर करून महिला आणि पुरुष दोघांना शिक्षित आणि सक्षम करणे हा पथनाट्याचा उद्देश होता. उजासचा ठाम विश्वास आहे की, अशा प्रभावशाली नाटकांचे आयोजन मासिक पाळीबद्दल खुल्या चर्चेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
 
पथनाट्याच्या प्रभावाविषयी बोलताना समाजप्रेरक, ‘उजास’च्या संस्थापक अद्वैतेशा बिर्ला (Adaitesha Birla) म्हणाल्या, “पथनाट्य हृदयाला मोहित करत मन मोकळे करणारा कला प्रकार आहे. समाजाला जागृत करून मुक्तसंवादाला प्रोत्साहन देण्याचे आमचे ध्येय आहे. त्यातून याबाबत बदल घडणार आहेत. पथनाट्याद्वारे समाजाला मासिक पाळीच्या बाबतीतील गैरसमज दूर करून मासिक पाळीच्या आरोग्याला जीवनाचा एक नैसर्गिक पैलू म्हणून स्वीकारण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतो. 
 
उजास’ पुणेच्या प्रमुख परवीन शेख म्हणाल्या, “आजवर २०७० मार्गदर्शन सत्रे आयोजिली आहेत. १३ वेगवेगळ्या ठिकाणी ३७८ शाळांमध्ये ८ लाख १५ हजार ९९८ सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) वितरित केले आहेत. मासिक पाळीबाबतची अस्पृश्यता, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून खुल्या चर्चेला चालना देण्याची गरज आहे, असा विश्वास ‘उजास’ला वाटतो. या उपक्रमाद्वारेमासिक पाळीच्या स्वच्छता दिनानिमित्त पुण्यातील किमान १० हजार व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना संभाषणात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.”
 
‘उजास’बद्दल
उजास’ हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम आहे. मासिक पाळीच्या संदर्भात असलेले गैरसमज कमी करून आणि पौगंडावस्थेतील मुली व महिलांना मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यासाठी सक्षम बनवून भारतातील मासिक पाळीच्या आरोग्यावर सकारात्मक आणि शाश्वत प्रभाव निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘उजास’मार्फत मोफत सॅनिटरी पॅड देण्याची मोहीम राबवली जाते. वितरण वाहिन्या आणि जागरुकता मोहिमेद्वारे, या बदलाचा वारसा पुढे चालवला जात आहे. मासिक पाळीचे आरोग्य ही सर्वात ज्वलंत परंतु कमी-प्राधान्यिक समस्यांपैकी एक आहे, जी दुर्दैवाने सार्वजनिक आरोग्य आव्हान आणि प्रगतीशील राष्ट्र उभारणीतील अडथळा म्हणून लक्षात येण्याऐवजी स्त्रीची समस्या म्हणून विभागली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *