पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याध्यक्षपदी सुनील रेडेकर

पुणे विद्यार्थी गृहाच्या कार्याध्यक्षपदी सुनील रेडेकर

कार्यवाहपदी प्रा. राजेंद्र कांबळे यांची फेरनिवड, तर कोषाध्यक्षपदी आनंद कुलकर्णी 

पुणे : शिक्षण व सामाजिक क्षेत्रात ११२ वर्षांहून अधिक काळ कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या कार्याध्यक्षपदी सुनील पांडुरंग रेडेकर यांची निवड झाली आहे. तर कार्यवाहपदी प्रा. राजेंद्र संपत कांबळे यांची फेरनिवड झाली आहे. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
 
नुकत्याच झालेल्या कौन्सिल व संचालक मंडळाच्या सभेत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. हे सर्व पदाधिकारी संस्थेचे देणगीदार, माजी विद्यार्थी, सेवक व विद्यमान संचालक आहेत. उप कार्याध्यक्षपदी एस. एम. जिर्गे, कोषाध्यक्षपदी आनंद गंगाधर कुलकर्णी व कुलसचिवपदी अमोल मधुकर जोशी यांची निवड झाली आहे. यावेळी संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुस्कर, कृष्णाजी कुलकर्णी उपस्थित होते.
 
प्रसंगी बोलताना सुनील रेडेकर म्हणाले, “११२ वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद वाटतो. ज्या संस्थेत शिकलो, त्याच संस्थेचा पदाधिकारी म्हणून काम करताना संस्थेची यशस्वी परंपरा सांभाळण्याची जबाबदारी आहे. संस्थेच्या सहा शाखा असून, ६५ शैक्षणिक व सामाजिक विभाग आहेत. सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यात आणखी भर घालून संस्थेचा विस्तार व नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *