सावरकर जयंतीनिमित्त ३१ रोजी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान

सावरकर जयंतीनिमित्त ३१ रोजी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ब्राह्मण सांस्कृतिक संघ बाणेर आणि हर घर सावरकर या संस्थांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व प्रभावी वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता. ३१ मे) सायंकाळी ६ वाजता बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये हे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, सावरकर विचार दर्शनचे संपादक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. मात्र, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, https://forms.gle/Ld5W1Lz1zSHN1P9w8 या लिंकवर नोंदणी करता येईल. मोफत प्रवेशिका व अधिक माहितीसाठी ९८२२३७७९३३, ९८२०९४१३४१, ९८५०१८८४६८, ९८५०१८५२९६ किंवा ८०८०००१३३८ या क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक व ब्राह्मण सांस्कृतिक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.