राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश

राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांनी अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील पक्ष कार्यालयात हा प्रवेश झाला.
 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष धीरजभैय्या शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब भाई मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे आदी यावेळी उपस्थित होते.
 
जावेद इनामदार म्हणाले, “माननीय अजित पवार यांच्या मार्गदर्शनात व धीरज शर्मा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आजवर काम केले आहे. विकासाच्या वाटेने चालणाऱ्या अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय शर्मा यांनी घेतल्यानंतर आम्हीही कार्यकर्त्यांसह अजितदादांसोबत जात आहोत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *