चिपळूण: सावर्डे येथील सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या संकुलात जीवनविद्या मिशनच्या वतीने आयोजित “विश्वप्रार्थना एक सुदर्शन चक्र” या समाज प्रबोधन सोहळ्याचा भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी सदगुरू श्री वामनराव पै यांचे चिरंजीव आणि जीवनविद्या मिशनचे मार्गदर्शक आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे आगमन झाले.
कार्यक्रमादरम्यान चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी श्री. प्रल्हाद वामनराव पै यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदारांनी कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा व्यक्त करत जीवनविद्या मिशनच्या समाजासाठी होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच, श्री. पै यांचे आशीर्वाद घेऊन, जीवनविद्या मिशनच्या विचारसरणीने समाजात सकारात्मक बदल घडेल तसेच “विश्वप्रार्थना एक सुदर्शन चक्र” या सोहळ्याने उपस्थितांमध्ये मूल्याधारित जीवनशैलीचा संदेश मिळेल आणि अध्यात्मिक जागृतीसोबतच समाजप्रबोधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल असे मत व्यक्त केले.