पुणे: मस्त कलंदरने जय बाबा स्ट्रायकर्सचा आठ गडी राखून पराभव करत सातव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा कलंदरचा कर्णधार दीप चंदनानी सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा अंतिम सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.

नाणेफेक जिंकून जय बाबा स्ट्रायकर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावात ७.३ षटकात अवघ्या २३ धावांत सर्व संघ बाद झाला. मस्त कलंदरने पहिल्या डावात ९ षटकांत ८१ धावा करीत ५८ धावांची आघाडी घेतली. धीरेन सचदेव (३०), कर्णधार दीप चंदनानी (२४) व जय सोमाणी (२१) यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. दुसऱ्या डावात जय बाबा स्ट्रायकर्सने सावध खेळ करत ९ षटकांत ७ बाद ६२ धावा उभारत अवघ्या ४ धावांची आघाडी घेतली. विजयासाठी ५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या मस्त कलंदरने १.४ षटकांत पाच धावा करीत विजय मिळवला.
सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून गेल्या सात वर्षांपासून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून साधू वासवानी मिशनमधील अनाथ मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे, असे नरेश नाशा यांनी सांगितले.
—————————— ——-
महिलांमध्ये नर्मदा टायटन्स विजयी
नर्मदा टायटन्स आणि सिंधू स्टारलेट्स यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात टायटन्स संघाने बाजी मारत तिसऱ्या महिला सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकावले. नर्मदा टायटन्सच्या सलामीवीर जिया जोऊकानी (५४) व कर्णधार मुस्कानच्या (२२) धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारित ८ षटकांत ४ बाद ९४ धावा केल्या. विजयासाठी ६७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सिंधू स्टारलेट्सचा डाव दोन बाद ६७ धावा असा आटोपला. टायटन्सने २७ धावांनी विजय मिळवत करंडक जिंकला.
————————-
संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)
पहिला डाव
जय बाबा स्ट्रायकर्स : ७.३ षटकांत सर्वबाद बाद २३ (धीरज दोडवानी १२, धीरेन सचदेव ४-३)
मस्त कलंदर: ९ षटकांत २ बाद ८१ (धीरेन सचदेव ३०, दीप चंदनानी २४, जय सोमाणी २१, वरुण आल्वानी २३-२)
दुसरा डाव
जय बाबा स्ट्रायकर्स : ९ षटकांत ७ बाद ६२ (चिंटू २३, धीरज दोडवानी १२, करण श्रॉफ १०, निखिल जावरानी ३-४, दीप चंदनानी १२-२)
मस्त कलंदर : १.४ षटकांत २ बाद ५ (मयूर तिलवानी २, वरुण आल्वानी ३-१, यश रमनानी २-१)
निकाल: मस्त कलंदर ८ विकेट्स राखून विजयी
