
डॉ. स्मृती हिंदारिया-पिसाळ या मिनिमली इन्व्हेसिव्ह हृदय शस्त्रक्रिया क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार असून, त्यांनी गेल्या दहा वर्षांत दोन हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना कमी वेदना, जलद पुनर्वसन आणि उच्च दर्जाची सेवा देण्यावर त्यांचा भर आहे. पुण्यातील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये त्यांनी कार्य केले असून, सध्या त्या कार्डिएक सर्जरी क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहेत. महिलांच्या हृदय आरोग्याविषयी जनजागृती आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.
यापूर्वीही त्यांच्या कार्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून, ‘आयएमए पुणे यंग अचिव्हर्स अवॉर्ड’मुळे त्यांच्या कार्याची दखल पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यंग अचिव्हर्स म्हणून झालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करीत डॉ. स्मृती हिंदारिया म्हणाल्या, “मिनिमल इन्वेझिव्ह व रोबोटिक सर्जरीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना देण्याचे माझे ध्येय आहे. या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले, तर रुग्णांना कमी वेदना होतील, तसेच त्यांचा बरा होण्याचा वेळ कमी होईल. हृदयाच्या आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी माझा प्रयत्न असतो. या सर्व कार्याला या पुरस्काराने अधिक प्रोत्साहन मिळेल.
