रोटरी क्लब सिंहगडरोडच्या वतीने गडकिल्ल्यांवर आपत्कालीन  बचावकार्य करणाऱ्या संस्थांना स्ट्रेचर वाटप.

रोटरी क्लब सिंहगडरोडच्या वतीने गडकिल्ल्यांवर आपत्कालीन बचावकार्य करणाऱ्या संस्थांना स्ट्रेचर वाटप.

पुणे (दि.१३) : गड किल्ल्यांवर असंख्य पर्यटक फिरण्यास जात असतात. अनेकदा यातील काहीजण तेथे घसरून पडतात – अपघातग्रस्त होतात.त्याचे बचावकार्य अनेक संस्था ग्रुप्स करीत असतात. त्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगडरोडच्या वतीने ४ अत्याधुनिक स्ट्रेचर प्रदान करण्यात आले. या स्ट्रेचरच्या सहाय्याने रुग्ण अथवा बॉडी खाच खळग्यातून ही सुरक्षित वाहतूक करते महत्वाचे म्हणजे ते एअर लिफ्ट (हेलिकॉप्टरने)सुद्धा करू शकते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती विर बाजी पासलकर स्मारक सिंहगडरोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे रोटरी प्रांत ३१३१चे प्रांतपाल संतोष मराठे, प्रख्यात इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, रोटरी क्लब सिंहगडरोडचे अध्यक्ष अमेय पासलकर, सचिव प्रियांका लागू, इंद्रजीत घोरपडे, सतीश खाडे (डायरेक्टर)आदी मान्यवरांच्या बरोबरच सिंहगड, तोरणा, रायगड, शिवनेरी व अन्य ठिकाणी आपत्कालीन बचाव पथकातील कार्यकर्ते, रोटरी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना पांडुरंग बलकवडे यांनी गडकिल्ले हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा ऐतिहासिक ठेवा आहे. तेथील आपत्कालीन सेवा करणार्यांचे कौतुक करावे तेव्हडे कमी आहे असे सांगितले. आपत्कालीन पथकातील सदस्यांनी बोलतांना रोटरीने यापूर्वी दिलेल्या स्ट्रेचर्सनी शेकडो जणांचे प्राण वाचविले आहेत, या नव्या स्ट्रेचर्सने यापुढील काळात असंख्य लोकांचे प्राण वाचतील असे सांगितले. अलका देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.