सूर्यदत्त’मध्ये योगी आत्मार्पित श्रद्धाजी यांचा योग आणि ध्यान ‘मास्टरक्लास’

सूर्यदत्त’मध्ये योगी आत्मार्पित श्रद्धाजी यांचा योग आणि ध्यान ‘मास्टरक्लास’

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अंतर्गत कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने
डायनॅमिक आणि सुप्रसिद्ध योगी आत्मार्पित श्रद्धाजी यांचा योग आणि ध्यान ‘मास्टरक्लास’
 
योगामुळे वाढते शाश्वत आनंद आणि शक्ती
योगी आत्मार्पित श्रद्धाजी; सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसतर्फे योग, ध्यान ‘मास्टरक्लास’
 
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अंतर्गत कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने डायनॅमिक आणि सुप्रसिद्ध योगी आत्मार्पित श्रद्धाजी यांचा योग आणि ध्यान मास्टरक्लास आयोजित करण्यात आला होता.
 

पूज्य गुरुदेव श्री राकेश संस्थापक श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर यांच्या वतीने या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले. एसआरएमडी योग प्रमुख आत्मार्पित श्रद्धाजी, एसआरएमडी योग कोअर टीम सदस्य आत्मार्पित सुप्रिनाबेन यांनी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

भगवान महावीरांच्या मार्गाच्या अनुयायी, श्रीमदराजचंद्रजी, पूज्य गुरुदेव श्री राकेशजी यांच्या निस्सीम भक्त आत्मार्पित श्रद्धाजी मूळच्या अँटवर्प, बेल्जियमच्या रहिवासी आहेत. अध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्यासाठी त्या भारतात आल्या. त्यांना एक संन्यासी म्हणून आजीवन ब्रह्मचर्य, साधना आणि सेवेची दीक्षा मिळाली आहे.

योग हा मूलत: तुमच्या ‘आत्मा’साठी तुमच्या शरीराच्या माध्यमातून कार्य करणारा एक सराव आहे. योगामुळे शाश्वत आनंद आणि शक्ती वाढते. विविध आसने, श्वास नियंत्रण आणि ध्यानाच्या माध्यमातून योग्  साधना गरजेची आहे, असे मत आत्मार्पित श्रद्धाजी यांनी व्यक्त केले.

एसआरएमडी योग हा पूज्य गुरुदेव श्रींनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुलभ करून साधकाची आध्यात्मिक प्रगती साधण्याचे साधन म्हणून केलेला उपक्रम आहे. आसन, प्राणायाम, ध्यान, तत्वज्ञान आणि इतर योगिक तंत्राद्वारे, योग एखाद्याचे शरीर, मन आणि आत्मा संरेखित करून जगण्याच्या सर्वांगीण मार्गाला प्रोत्साहन देते, असे ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.

 

‘योग से ही होगा’ संकल्पनेनुसार या अगोदर २१ जूनला ‘तालआरोग्यम’चे संयोजन करण्यात आले होते. यामध्ये ३००० हुन अधिकजणानी सहभाग नोंदविला होता. या उपक्रमाचे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आले. ‘सूर्यदत्त’ योग आणि भारतीय परंपरेचा नेहमीच पुरस्कार करते. अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात उत्तम आरोग्य हि प्राथमिकता झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, विभागप्रमुख मनीषा कुंभार, संचालक प्रशांत पितालिया, अश्विनी देशपांडे, डॉ. कांचन गोडे, ‘एसआरएमडी’चे निशा मेहता, भरत मेहता, नीना मेहता, सुनील मेहता, केवल मेहता, कृतिक दोशी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. ऋचा वैद्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *