माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचा जाहीर सत्कार

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचा जाहीर सत्कार

पुणे : सनदी लेखापाल म्हणून तसेच शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. देशाचे माजी केंद्रीय मंत्री खासदार पद्मभूषण शरद पवार, स्वामी आचार्य गोविंद गिरी महाराज, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि. ३ डिसेंबर) सकाळी ९.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे हा सत्कार समारंभ होणार आहे, अशी माहिती सीए (डॉ.) एस. बी. झावरे गौरव समितीचे उपाध्यक्ष सीए चंद्रशेखर चितळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी उपाध्यक्ष सीए धनंजय जोशी, डॉ. एम. एस. जाधव, सचिव सीए यशवंत कासार, खजिनदार सीए अभिषेक धामणे, सीए गोविंद काकडे, सीए शिरीष देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांच्या यशस्वी कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सनदी लेखापाल म्हणून, तसेच सामाजिक, व्यावसायिक व शिक्षण क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. देशविदेशात उच्च पदांवर कार्यरत असलेल्या १० हजार पेक्षा अधिक सनदी लेखापालांचे गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या, मित्रांच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सीए सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील गौरव समिती स्थापन केली आहे.”
 
सीए धनंजय जोशी म्हणाले, “झावरे सरांनी गेली ५० वर्ष अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहेअत्यंत कठीण पार्श्वभूमी असतानाही बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी सीए होत शिक्षण प्रसाराचे व्रत पुढे नेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी सीए बनण्याचे स्वप्न घेऊन त्यांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात दाखल होतात. सीए करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ते आधारस्तंभ आहेत. गेल्या ५० वर्षात झावरे प्रोफेशनल अकॅडमीच्या माध्यमातून १० हजारांहून अधिक सनदी लेखापाल त्यांनी घडवले आहेत.  एका समर्पित वृत्तीच्या शिक्षकाचा हा सन्मान आहे. “
 
सीए यशवंत कासार म्हणाले, “द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) अर्थात सीए इन्स्टिटयूटचे सेंट्रल कौन्सिल मेंबर म्हणून अनेक पातळ्यांवर झावरे सरानी सीए प्रोफेशनसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेसीए प्रोफेशनसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहेदेशविदेशातील अनेक सीए संबंधित संस्थांवर त्यांनी विविध भूषवली आहेत. एशियन ओसिएनिएन स्टॅंडर्ड सेटर्स ग्रुपचे (एओएसएसजी) उपाध्यक्ष, अध्यक्ष, ‘आयसीएआय’च्या अकौंटिंग स्टॅंडर्ड बोर्डचे (एएसबी) अध्यक्ष, नॅशनल ऍडव्हायझरी कमिटी ऑन अकाउंटिंग स्टॅंडर्डचे विशेष निमंत्रित आदी पदांवर त्यांनी काम केले आहे.”
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *