प्राचीन संहिता गुरुकुलाच्या चार अभ्यासक्रमांना दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची मान्यता

प्राचीन संहिता गुरुकुलाच्या चार अभ्यासक्रमांना दिल्लीच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाची मान्यता

पुणे : दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाकडून प्राचीन संहिता गुरुकुलाच्या चार आयुर्वेद अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली प्राचीन संहिता गुरुकुल ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिलीच संस्था ठरली आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. राजेश कोटेचा, आयुर्वेद महर्षी डॉ. मनोज नेसरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या डॉ. तनुजा नेसरी, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांच्या हस्ते गुरुकुलाचे प्रमुख डॉ. हरीश पाटणकर यांनी मान्यतेचे प्रमाणपत्र स्वीकारले.
प्राचीन संहिता गुरुकुल ही आयुर्वेदातील विद्यार्थी घडविणारी संस्था असून, या संस्थेच्या सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी विथ मॉडर्न आस्पेक्ट (बेसिक, २०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी अँड ट्रायकोलॉजी विथ मॉडर्न आस्पेक्ट (अडवान्सड, ५०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेदिक क्लिनिकल डायटेटिक्स, न्यूट्रिशन अँड इम्युनिटी (२०० तास), सर्टिफिकेट कोर्स इन मर्म अँड नाडी विज्ञान (२०० तास) या चार अभ्यासक्रमांसाठी ही मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे नऊ संस्थांना प्रमाणित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रामधून प्राचीन संहिता गुरुकुल ही एकमात्र संस्था आहे.
 
या यशाबद्दल डॉ. हरीश पाटणकर यांनी आनंद व्यक्त केला. ‘भारत सरकारच्या सर्वोत्तम संस्थेकडून गौरव होणे आनंदाची बाब आहे. सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज, गुरू वैद्य समीर जमदग्नी, वैद्यराज दिवाकर जुवेकर, प्राचीन संहिता गुरुकुलचे सर्व गुरूवर्य आणि ज्ञानसंकुल विद्यार्थी संघाचे सर्व विद्यार्थी यांचे खूप मोठे योगदान आहे. तसेच गुरुकुलाच्या उभारणीत आई-वडील, बंधू पंकज पाटणकर, पत्नी डॉ. स्नेहल पाटणकर यांचा मोठा वाटा आहे. डॉ. रश्मी वेद, मनीष जानी, डॉ. गायत्री संत, डॉ. गायत्री पांडव यांच्यासह वैद्य निलेश ढवळे, विवेक आंबरे, ओमप्रसाद जगताप, स्वप्नील भाकरे, केदार जोशी आणि अगणित जुने व नवे प्राचीन संहिता गुरुकुल आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एन्सीएंट सायन्सेस एंड मॉडर्न टेक्नोलॉजीचे सहकारी यांची साथ लाभली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *