‘स्पर्श इन्स्टिट्यूट’तर्फे सौंदर्यशास्त्रावर
मोफत कौशल्य विकास कार्यशाळा
पुणे : स्पर्श इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अस्थेटिक अँड कॉस्मेटोलॉजी व क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘स्पर्श इन्स्टिट्यूट’च्या संस्थापिका गायत्री पाटील यांनी सौंदर्यशास्त्रातील करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले.
धायरी फाटा येथील स्पर्श इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यशाळेत ७०-८० महिलांनी सहभाग नोंदवला. क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान व नूतन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संस्थापिका सुनीता डांगे उपस्थित होत्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
गायत्री पाटील म्हणाल्या, “ब्युटिशियन व कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून करिअरच्या मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रातील बेसिक व अडवान्सड डिप्लोमा कोर्स केल्यास, नोकरी व व्यवसायाची संधी मिळू शकते. मुली व महिलांनी यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करावीत. कॉस्मेटोलॉजी, ट्रायकोलॉजी, क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी, हेअर, स्किन, लेझर थेरपी, पर्मनंट मेकअप आदींमध्ये महिलांना करिअर करता येते.