पं. भीमसेन जोशी महोत्सव उद्यापासून

पं. भीमसेन जोशी महोत्सव उद्यापासून

पं. भीमसेन जोशी महोत्सव उद्यापासून
 
पुणे : कलाश्री संगीत मंडळ आणि दी औंध सोशल फाउंडेशन यांच्या वतीने शुक्रवार ते रविवार दरम्यान (१६ ते १८ जून) भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव आयोजिण्यात आला आहे. औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे तिन्ही दिवस सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत कलाकारांचे सादरीकरण होणार आहे.
 
महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष असून, या वर्षी अभिजित गायकवाड यांनी महोत्सवाला विशेष सहकार्य केले आहे. बासरीवादक पं. केशव गिंडे यांचे शिष्य सिद्धांत कांबळे यांच्या बासरीवादनाने महोत्सव सुरू होईल. पहिल्या दिवशी किराणा घराण्याचे सुधाकर चव्हाण, मंजूषा पाटील यांचे गायन होणार आहे.
 
दुसऱ्या दिवशी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर यांचे गायन, पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूरवादन आणि पं. शौनक अभिषेकी यांचे गायन होणार आहे.
 
महोत्सवाच्या अखेरच्या सत्रात रविवारी पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन, बासरीवादक दीपक भानुसे आणि जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन होणार आहे.
 
प्रा. विश्वास जाधव यांना पुरस्कार
कलाश्री संगीत मंडळाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार मुंबईतील गांधर्व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रा. विश्वास जाधव यांना जाहीर झाला आहे. ११ हजार रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. १६ जूनला पुरस्कार वितरण होणार आहे.
 
 
 
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *