सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या शांभवी सरोजला
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत कांस्य पदक
पुणे : बँकॉक थायलंड येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या शांभवी सरोजने कांस्य पदक पटकावले. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या शांभवीने फ्लोवर इव्हेंटच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारत स्पर्धेत ७ वे स्थान मिळवले. शांभवीच्या या यशाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी तिचे कौतुक केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना नेहमीच सर्वांगीण विकासासाठी प्रेरित केले जाते. निरोगी शरीर आणि निरोगी मनासाठी खेळ महत्वाचे आहेत. सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये हॉर्स रायडींगसह सर्व खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच त्यांना विविध स्पर्धामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले जाते. पालकांच्या सहभागामुळे हे शक्य होते.”
चोरडिया दाम्पत्यासह ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, प्राचार्या शीला ओक, क्रीडा शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शांभवी सरोजचे उज्वल यशाबद्दल अभिनंदन केले. पालकांसह शाळेने कायम खेळासाठी प्रोत्साहित केले असून, त्यांचे आभार मानते, असे शांभवीने सांगितले.