ॲड. अश्विन आचार्य यांचे मत; ‘एमटीपीए’तर्फे १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

ॲड. अश्विन आचार्य यांचे मत; ‘एमटीपीए’तर्फे १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

‘टॅक्सेशन लॉ’च्या अंमलबजावणीत कर सल्लागाराची भूमिका महत्वपूर्ण
‘एआयएफटीपी’चे ॲड. अश्विन आचार्य यांचे मत; ‘एमटीपीए’तर्फे १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन
 
पुणे : “कर संकलनात, तसेच करदात्यांना मार्गदर्शन करण्यात कर सल्लागार आघाडीवर असतो. करप्रणाली कायद्याबाबत करदात्यांना जागृत करून त्याची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करण्यात कर सल्लागाराची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे कर सल्लागारांनी कर व्यवस्थापनासह कायद्याचे ज्ञानही आत्मसात करावे,” असे मत ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सच्या पश्चिम विभागाचे निर्वाचित अध्यक्ष ॲड. अश्विन आचार्य यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने १६ व्या करप्रणाली कायदा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन आचार्य यांच्या हस्ते झाले. प्रसंगी यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे डॉ. राहुल बिबवे, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष सीएमए श्रीपाद बेदरकर, उपाध्यक्ष ॲड. अमोल शहा, सचिव प्रसाद देशपांडे, अभ्यासक्रम चेअरमन मनोज चितळीकर, समन्वयक प्रणव सेठ, मिलिंद हेंद्रे, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शरद सूर्यवंशी, खजिनदार ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिव ॲड. अनुरुद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी ‘एमटीपीए’ व यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय यांच्यात जीएसटी व टॅक्सेशनच्या अभ्यासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
 
ॲड. अश्विन आचार्य म्हणाले, “आर्थिक लेखांकन, कर व्यवस्थापन करताना ‘बेसिक्स’ व ‘इथिक्स’ या दोन्ही गोष्टी पाळाव्यात. आज कर सल्लागार म्हणून काम करताना अनेक स्रोत उपलब्ध आहेत. संगणकीय प्रणाली आलेल्या आहेत. त्यामुळे संदर्भ तपासता येतात. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सतत शिकण्याची आणि उच्च ध्येय ठेवून त्याच्या पूर्तीसाठी कठोर परिश्रम करण्याची वृत्ती जोपासावी.”
 
ॲड. राहुल बिबवे म्हणाले, “कर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्वाचा आहे. कर सल्लागार म्हणून काम करताना कायद्याचे ज्ञान असायला हवे. करप्रणाली आणि कायदा या दोन्हीचे ज्ञान असेल, तर आजच्या काळात मोठ्या संधी आहेत. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार आहे. लोकांच्या कल्याणासाठी करप्रणाली कायद्याची अंमलबजावणी व्हावी.”
 
सीएमए श्रीपाद बेदरकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले. मनोज चितळीकर यांनी अभ्यासक्रमाचे स्वरूप सांगितले. मिलिंद हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अमोल शहा यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *