पुणे विद्यार्थी गृहाचा ११२ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

पुणे विद्यार्थी गृहाचा ११२ वा वर्धापनदिन साधेपणाने साजरा

पुणे : शिक्षण क्षेत्रातील नामांकित पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा ११२ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शासकीय नियमांचे आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करून संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम-लक्ष्मण आणि कुलगुरू कै. दादासाहेब केतकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
दरवर्षी संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा होतो. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे वेदघोष, स्वागत समारंभ व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले. बुधवारी सकाळी संस्थेच्या मुख्य कार्यालयात कुलगुरू दादासाहेब केतकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेन्द्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, संचालक सर्वश्री कृष्णाजी कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, रमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने सोशल माध्यमांद्वारे हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी आदींनी शुभेच्छा संदेश पाठवले. तसेच अनेकांनी ऑनलाईन देणगी संस्थेच्या खात्यावर जमा केली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व देणगीदारांची आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *