सार्वजनिक आरोग्य सुविधा सक्षम करण्यात ‘सुदर्शन’चा पुढाकार

सार्वजनिक आरोग्य सुविधा सक्षम करण्यात ‘सुदर्शन’चा पुढाकार

रोहा : जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज ही कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे. शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास साधण्यासाठी ‘सुदर्शन’ कटिबद्ध आहे. याचाच भाग म्हणून सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, गरजुना उपचारासाठी मदत, कोरोना काळात निर्जंतुकीकरण फवारणी, गरजु कुटुंबांना धान्य वाटप, जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
रोहा तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य यंत्रणा जीवनदायिनी ठरत आहे. आजही येथील गोरगरीब जनता वैद्यकिय उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरच अवलंबून आहे. रोह्याच्या आदिवासी वाड्या-वस्त्यांतील गरजू रुग्णांना तात्काळ वैद्यकिय मदतीसाठी आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, रोहा उपजिल्हा रुग्णालय हाच एकमेव पर्याय उपलब्ध असतो. या ठिकाणी गरजु लोकांना चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होणेसाठी ‘सुदर्शन’कडून वेगवेगळ्या स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे.

– प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया विभागासाठी AC, वाशिंग मशिनची भेटअपुऱ्या साधन सामुग्रींमुळे रुग्णांना उपचार पुरविण्यात खुप अडचणी येत होत्या. गोरगरीब रुग्णांना कुटुंब नियोजन व इतर शस्त्रक्रियांसाठी माणगांव किंवा जिल्ह्यात इतरत्र जावे लागत होते. यामध्ये रुग्णांची खूप गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेत ‘सुदर्शन’कडून आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया विभागासाठी एसी भेट देण्यात आला. त्यामुळे आता नियंत्रित वातावरणामध्ये शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. परिणामी रुग्णांची गैरसोय थांबेल. तसेच रुग्णांना स्वच्छ, निर्जंतुक बेड उपलब्ध होण्यासाठी ‘सुदर्शन’कडून येथे वॉशिंग मशिनही भेट देण्यात आले आहे.

-रोहा उपजिल्हा रुग्णालयास तीन HFNO मशिन, वाशिंग मशिन
रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाग्रस्तांसाठी सुदर्शनकडून HFNO मशिन भेट देण्यात आलेल्या मशिन आजच्या या आणीबाणीच्या काळात अखंडपणे सेवा बजावीत आहेत. तसेच हॉस्पिटल मधील कपडे स्वच्छ व निर्जंतुकिरण करणेसाठी सुदर्शनने दिलेल्या वाशिंग मशीनचा चांगला उपयोग होत आहे.

– कोकबन लसीकरण केंद्रास खुर्च्या
सध्या सुरु असणाऱ्या लसीकरणामुळे कोकबन आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावर प्रतीक्षा करण्याऱ्या लोकांची अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे गैरसोय होत होती. ‘सुदर्शन’कडून या लसीकरण केंद्रास खुर्च्या भेट देण्यात आल्या. त्यामुळे केंद्रावर लोकांची होणारी गैरसोय दूर झाली आणि लसीकरण सुरळीत होण्यास मदत होत आहे.

-रोहा उपजिल्हा रुग्णालयास १०० पीपीई किट
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे सेवा बजविणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांना आवश्यक पीपीई किट, हॅन्डग्लोजची कमतरता भासत होती. ‘सुदर्शन’ने याची दखल घेत रोहा उपजिल्हा रुग्णालयास १०० पीपीई किट, हॅन्डग्लोज सुपूर्त केले. ‘सुदर्शन’च्या या प्रयत्नामुळे डॉक्टर्स, नर्सेस यांना सुरक्षित वातावरणामध्ये सेवा पुरविण्यास मदत होत आहे.

सुदर्शनच्या सीएसआर फौंडेशन ने ऑपरेशन थिएटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या AC मुळे कुटुंब कल्याण सारख्या शस्र क्रिया करण्यास मदत होणार आहे.”
-डॉ. कृष्णा चव्हाण, वैद्यकिय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र,आंबेवाडी

“सुदर्शन कडून देण्यात आलेल्या अत्याधुनिक HFNO मशिन मुळे कोविड रुग्णांना अत्यावश्यक प्राणवायु देण्यास खुप मदत होत आहे. यापुढेही रुग्णालयातील आरोग्य सुविधा सक्षमीकरणासाठी सुदर्शनचे सहकार्य मिळावे.”
– डॉ. अंकिता खैरकर, वैद्यकिय अधिक्षक, रोहा उप-जिल्हा रुग्णालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *