स्वरनील एंटरटेनमेंट्स यांच्या वतीने “माझे विठ्ठल रखुमाई” गीताची निर्मिती

स्वरनील एंटरटेनमेंट्स यांच्या वतीने “माझे विठ्ठल रखुमाई” गीताची निर्मिती

पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधत स्वरनील एंटरटेनमेंट्स चे निलेश माटे यांच्या वतीने “माझे विठ्ठल रखुमाई” या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. या गीताचा प्रीमियर १७ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता स्वरनील एंटरटेनमेंट्स च्या युट्यूब पेजवरून करण्यात येणार असल्याची माहिती निर्माते निलेश माटे यांनी दिली. प्राध्यापक देवदत्त भिंगारकर यांच्या गीताला सुयश खटावकर या युवा संगीतकाराने संगीतबध्द केले आहे. प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांनी हे गीत गायले असून संगीत संयोजन तेजस चव्हाण यांचे आहे.
विठूरायाचे प्रत्यक्ष दर्शन सध्या घेता येत नसल्याने हे स्वरदर्शन भक्तांना आनंद देईल असा विश्वास निलेश माटे यांनी व्यक्त केला. स्वर शब्दांच्या माध्यमातून विठ्ठलाची आणि त्याच्या भक्तांची केलेली ही सेवा अवघे मराठीजन गोड मानून घेतील असा भाव सहभागी कलाकारांच्या मनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *