‘स्वातंत्र्य संग्रामातील  विज्ञानाचे योगदान’ कार्यशाळेत सादरीकरण

‘स्वातंत्र्य संग्रामातील विज्ञानाचे योगदान’ कार्यशाळेत सादरीकरण

डॉ बाळकृष्ण दामले यांचा सहभाग 

पुणे :’नॅशनल कॉन्फरन्स ऑफ सायन्स कम्युनिकेटर्स अँड सायन्स टीचर्स’ या या परिषदेत ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील विज्ञानाचे योगदान’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत डॉ बाळकृष्ण दामले यांनी सहभाग घेतला.

विज्ञान शिक्षण ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाचा वापर करून अधिक रंजक आणि अधिक व्यापक कसे करता येईल, याविषयीचा रिसर्च पेपर त्यांनी सादर केला.सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड पॉलिसी रिसर्च , विज्ञान प्रसार संस्था,विज्ञान भारती यांनी या परिषदेचे आयोजन केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ही राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सीएसआयआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अॅण्ड पॉलिसी रिसर्च चे संचालिका प्रा. रंजना अगरवाल, विज्ञान प्रसार संस्थेचे संचालक डॉ. नकुल पराशर, विज्ञान भारतीचे सचिव जयंत सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते डॉ.बाळकृष्ण दामले यांना प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ दामले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया सेंटर(ईएमआरसी) येथे कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *