८५ व्या वाढदिवशी डॉ. के. एच. संचेती करणार आपली शेवटची शस्त्रक्रिया

८५ व्या वाढदिवशी डॉ. के. एच. संचेती करणार आपली शेवटची शस्त्रक्रिया

आत्तापर्यंत ५५,००० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्या ८५ व्या वाढदिवशी डॉ. के. एच. संचेती शेवटची शस्त्रक्रिया करणार आहेत. ही शस्त्रक्रिया नितंब पुनररोपण शस्त्रक्रिया ( Total Hip Replacement ) असणार आहे. यानंतरही ते रुग्णांना तपासण्याकरिता हॉस्पिटलमध्ये येत राहतील.
संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष तसेच पद्मभूण डॉ. के. एच. संचेती त्यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त शेवटची शस्त्रक्रिया करणार आहेत. या दिवसाचे औचित्य साधून ते आपल्या शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या वैद्यकीय सेवेचा शेवट करतील. त्यांची आवडती नितंब रोपण शस्त्रक्रिया करून नंतरही ते बाह्यरुग्ण विभागात रुग्णांना तपासण्यास हॉस्पिटलमध्ये येत राहणार आहेत.
इतक्या शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले डॉ. संचेती, ज्यांनी भारतातील पहिली संपूर्णत: स्वदेशी आणि स्थानिक शस्त्रक्रिया केली ते या निमित्ताने सांगतात, ‘१९६५ मध्ये हॉस्पिटल सुरू केल्यानंतर मी आत्तापर्यंत अविरतपणे काम करत आहे. माझी कायम आवडीची असलेली शस्त्रक्रिया उद्या मी करेन आणि वैद्यकीय क्षेत्रातील शस्त्रक्रियेच्या माझ्या कामाला पूर्ण विराम देईन. रुग्णांना तपासण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये नक्कीच येत राहीन. यापुढे हॉस्पिटमध्ये प्रशासकीय कामात तसेच नवीन इमारतीच्या बांधकामात मी नक्की लक्ष देण्याचा मानस आहे.
डॉ. संचेती यांना पद्मभूषण तसेच पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
डॉ. पराग संचेती, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष, संचेती हॉस्पिटल याबद्दल सांगतात,’ इतक्या वर्षात माझ्या वडिलांनी कधीही काम थांबवले नाही. आजही रुग्णसेवा हेच त्यांचे प्राधान्य आहे. ते आमचे आदर्श आणि प्रेरणा स्थान आहेत. रुग्णसेवेसाठी इतके मोठे विश्व उभे केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्यांचा सल्ला माझ्यासाठी कायमच महत्त्वाचा असणार आहे.’
डॉ. संचेती असेही सांगतात, ‘सध्या मी स्वतः ला गुंतवून ठेवण्यासाठी वेगवगळे मार्ग शोधले आहेत. मी नियमित व्यायाम करतो. ज्यात दिवसाला तीन किलोमीटर चालतो. शिवाय मी एक पुस्तकही लिहीत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *