महावितरणच्या उत्कृष्ट ५९ जनमित्रांचा सहकुटुंबासह गौरव
पुणे, दि. ०३ – वीजक्षेत्र हे अतिशय धकाधकीचे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना अविश्रांत सेवा देताना कायम युद्धपातळीवर कार्यरत राहावे लागते. गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ५९ तांत्रिक कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मात्र या पुरस्कारामध्ये त्यांच्या कुटुंबियांचाही मोठा वाटा आहे. याची जाणीव ठेवून उत्कृष्ट कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह हा पुरस्कार स्वीकारला याचा मनापासून आनंद आहे, असे गौरवद्गार पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी गुरूवारी (दि. १ मे) काढले.
महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट १२ यंत्रचालक व ४७ तांत्रिक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले. रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सर्वश्री सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव नेहते, रवींद्र बुंदेले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रादेशिक संचालक श्री. खंदारे यांनी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व पाल्यांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. तर मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे म्हणाले, की वीजयंत्रणेचे ज्ञान असले तरी तांत्रिक कर्मचाऱ्यांनी कोणताही धोका पत्करू नये. वीजयंत्रणेत काम करताना स्वतःच्या वीज सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे यांनी केले व आभार मानले.
पुणे परिमंडलातील विभागनिहाय उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे– संदिप झगडे, सुनिल जाधव, विदया बांदल, दिगंबर नागरगोजे (बंडगार्डन विभाग), बुवासाहेब घुले, संदिप बोबडे, नितेश सूर्यवंशी, अनंतकुमार भोरे (नगररोड विभाग), विजय ठोंगिरे, दिपक शिंदे, रामेश्वर फलफले, तुषार पाटील (पदमावती विभाग), गजानन गवई, महादेव चांगीरे, रमेश सवडे, युवराज बारवकर (पर्वती विभाग), शिवाजी कुतवळ, बाळासाहेब भोकटे, देविदास शिंदे, सोपान पोरे (रास्तापेठ विभाग), सोनाली भाडळे (रास्तापेठ शहर चाचणी विभाग), गणेश कराड (भरारी पथक रास्तापेठ शहर मंडल), मच्छिंद्र जेकटे, नीलेश बनकर, दिपक आरसुळे, तुकाराम काळे, रोहिदास कडाळे, दिलीप सोळंके (मंचर विभाग), निवेदिता कांबळे, लक्ष्मण सावळे, लक्ष्मण बहिर, पोपट खरमाटे, भगवंत भिकाने (मुळशी विभाग), शिवाजी जढर, ओमप्रकाश इंगळे, दिलीप ससाणे, निलेश ठोंबरे, रविंद्र टाकळकर, जेजेराम आंधळे, संदिप शेळके (राजगुरूनगर विभाग), दिलीप खेडेकर (पुणे ग्रामिण चाचणी विभाग), नरेंद्र फेगडे, सचिन कोपराटकर, प्रज्ञा ऊके, अविनाश पवळे, विनोद तावरे (भोसरी विभाग), प्रविण कुऱ्हाडे, विशाल बुरडे, अभिजित जमादार, बापू केसरे (कोथरूड विभाग), संतोष खताळ, रविंद्र आम्ले, इंद्रजीत खरबस, तौफिक सय्यद (पिंपरी विभाग), राजेंद्र गोटल, किशोर सायकर, शंकर मुंडे, नितीन मुद्रके (शिवाजीनगर विभाग), चंद्रकांत भोईर (गणेशखिंड शहर चाचणी विभाग).