वसंत पंचमी चे औचित्य साधत शारदा शिक्षण संस्थेने महिलांसाठी “जागर महीलासबलिकरनाचा” ह्या विषयावर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलाना आमंत्रित केले होते. यामध्ये महिला बालकल्याण समिती अध्यक्ष रुपाली ताई धाडवे , नगरसेविका रंजनाताई टिळेकर , माजी नगरसेविका विजयाताई वाडकर, नगरसेविका मनीषा ताई कदम , नगरसेविका ऋषालिताई कामठे, इलाईट शाळेच्या मुख्याध्यापिका जागृती अभंग, ॲक्टिव शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी कुंभार यांच्याशी रिता इंडिया फाऊंडेशन च्या संस्थापिका रिता शेटीया यांनी चर्चा केली.
यावेळी शारदा शिक्षण संस्थेतर्फे टीचर ट्रेनिंग कोर्स करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना/सवलतींची घोषणा रुपाली ताई धाडवे, शारदा शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शीतल माळी आणि रंजनाताई टिळेकर यांनी केल्या. यामध्ये फी सवलत ५०% , नोकरी ची हमी आणि नोकरी न लागल्यास ५०% फी परत. यावेळी हळदी कुंकू समारंभ ही संस्थे तर्फे करण्यात आला.
यावेळी रुपाली ताई म्हणाल्या, शारदा शिक्षण संस्थेतर्फे महिलांसाठी घेण्यात येणारा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. मनीषा ताई म्हणाल्या, रोजगार निर्मिती द्वारे महिला सबलीकरण घडून आणण्याचे काम ही संस्था करत आहे आणि भविष्यातही करत राहील. इतर प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी भावी कार्यासाठी संस्थेस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव डींगोरकर , गौरी वनारसे, शुभदा चवाथे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.