दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘सूर्यदत्त’चा पुढाकार

दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘सूर्यदत्त’चा पुढाकार

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये दिव्यांग मुलांसोबत ‘जल्लोष २०२३’ कार्यक्रम

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी आयोजित ‘जल्लोष २०२३’ (ट्रिओ सेलेब फेस्ट २०२३) आनंद मैत्रीचा, उत्सव नात्यांचा व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप या सांस्कृतिक कार्यक्रमावर इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स अशा एकूण चौदा विश्वविक्रमांची मोहोर उमटली.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील सूर्यभवनमध्ये आयोजित या दिव्यांग मुलांच्या स्नेहमिलनात जादूचे प्रयोग, नृत्याविष्काराचे सादरीकरण, खाऊ वाटप, फुग्यांची उधळण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप असे उपक्रम घेण्यात आले. यंदा कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे.

दिव्यांग मुलांच्या २१ शाळांमधून तब्बल ६०० विद्यार्थी एकत्रित येऊन त्यांच्यासाठी सलग चार तास विविध उपक्रम करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. यामध्ये इंडिया स्टार बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स, रिपब्लिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, उत्तरप्रदेश वर्ल्ड रेकॉर्ड्स, युके वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स, वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडियन आयकॉन रेकॉर्ड्स, इंटर्नशनल वुमेन्स वर्ल्ड रेकॉर्ड्स, उत्तराखंड बुक ऑफ रेकॉर्ड्स, होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड्स, आसाम बुक ऑफ रेकॉर्ड्स, बंगाल बुक ऑफ रेकॉर्ड्स या चौदा विश्वविक्रमांचा यात समावेश आहे.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, समाजकल्याण विभागाचे अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, सकाळ सोशल फाऊंडेशनचे राहुल गरुड, लायन्स क्लबच्या संचालक (दिव्यांग कल्याण) सीमा दाबके यांच्या हस्ते गुणी मुलांचे कौतुक करण्यात आले. प्रसंगी डॉ. शीतल बागुल, माधुरी पंडित, शांतिदूत परिवारच्या सदस्य तृषाली जाधव आदी उपस्थित होते. ‘सूर्यदत्त’ला २५ वर्षे पूर्ण होत असल्याने दिव्यांगांसाठी काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, सोशल वर्कर्स, मानस शास्त्रज्ञ, काळजीवाहक अशा २५ जणांचा ‘सूर्यदत्त सुर्यभारत सूर्यगौरव पुरस्कार २०२३’ने सन्मान करण्यात आला.

 

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “दिव्यांग मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सूर्यदत्त’च्या वतीने ‘जल्लोष २०२३’चे आयोजन केले असून, त्यांना अधिक सोयीसुविधा देण्यासाठी ‘सूर्यदत्त’कडून नेहमी प्रयत्न केले जात आहेत. ‘जल्लोष २०२३’ हे वर्ष आमच्यासाठी खास आहे. यंदा तब्बल २१ शाळांमधून ६०० दिव्यांग विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्रित होऊन ते अशा प्रकारचा उत्सव साजरा करत आहेत. शिवाय सूर्यदत्त नॅशनल स्कुलचे ६००, तसेच आदिवासी भागातून १०० विद्यार्थी व पालक त्यांच्यासोबत हा उत्सव साजरा करण्यासाठी सहभागी झाले. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनकडून एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग मुले एकत्र घेऊन अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केल्याने हा एक अनोखा प्रकारचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.”

“दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये मला देव दिसतो. त्यांच्यात अफाट ऊर्जा असते. दिव्यांगांकडे आपण काहीतरी कमतरता आहे, असे न बघता त्यांना देवानी दिलेली ही देणगी आहे, असे पाहिले पाहिजे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांनाही आपले आयुष्य सर्वसामान्य मुलांप्रमाणे जगता यावे. यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सूर्यदत्त दरवर्षी राबवते, यंदाचे हे १३ वे वर्ष असून यंदा या उपक्रमाची नोंद विश्व विक्रमात झाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग मुले, सर्वसामान्य मुले, दुर्गम भागातील मुले एकत्र येऊन नववर्ष, ख्रिसमसचे स्वागत करत आहेत. पहिल्यांदाच असा उपक्रम होत आहे. या मुलांसाठी कार्यरत संस्थांचे कार्य कौतुकास्पद आहे,” असे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी नमूद केले.

प्रवीण कोरगंटीवार म्हणाले, “दिव्यांगांसाठी काम करण्यात पुणे जिल्हा अग्रेसर आहे, याचा अभिमान आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून काम करणे आणि प्रत्यक्षात तन-मन-धन झोकून देऊन काम करण्यात खूप फरक आहे. चोरडिया दाम्पत्य सर्वस्व झोकून दिव्यांगांसाठी काम करत आहेत. ‘सूर्यदत्त’चा आदर्श इतर सामाजिक संस्थानी घेण्याची गरज आहे. दिव्यागांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे फार गरजेचे आहे.”

राहुल गरड म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेच्या सहकार्याने सकाळ सोशल फाउंडेशन सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोत. दुर्गम, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर महिन्याला २५ ते ३० सायकलचे वाटप केले जाते. सूर्यदत्तला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे रायगड जिल्ह्यातील म्हसाळ येथील २५ विद्यार्थ्यांना सायकल देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे शारीरिक कष्ट कमी होऊन त्यांना अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.”

सीमा दाबके म्हणाल्या यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या, “यंदा कार्यक्रमाचे तेरावे वर्ष असून, दरवर्षी सूर्यदत्त संस्था यासाठी सर्वस्व झोकून देऊन हा कार्यक्रम यशस्वी करते. या उपक्रमातून चोरडिया दांम्पत्य नेहमी आमच्या मुलांचे हट्ट पुरवतात. त्यातून दिव्यांग मुलांचे मनोबल वाढण्यास मदत होते. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि बळ मिळते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *