‘घे भरारी’ चार दिवसीय प्रदर्शन गुरुवारपासून – निर्मला रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; सर्वांसाठी विनामूल्य खुले

‘घे भरारी’ चार दिवसीय प्रदर्शन गुरुवारपासून – निर्मला रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; सर्वांसाठी विनामूल्य खुले

पुणे : छोटे व्यावसायिक, महिला व्यावसायिक यांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने व्यावसायिकांनी व्यावसायिकांसाठी चालवलेल्या ‘घे भरारी’ या फेसबुक ग्रुपच्या वतीने चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजच्या मैदानावर ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर यांनी दिली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, नगरसेवक किरण दगडे पाटील, बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, घरगुती अत्तरापासून ते कलात्मक वस्तूंपर्यंत, हॅण्डमेड, धारवाडी खणापासून बनवलेले दागिने, पेपर फिंलिंग फ्रिज मॅग्नेट, ऍक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, भाज्या व फळासाठी फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या आदी वस्तू, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा असे पदार्थ, लहानांसाठी खेळण्यांचे असे स्टॉल असणार आहेत, असे संयोजक राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *