‘सूर्यदत्त’ला सलग दुसऱ्या वर्षी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर

‘सूर्यदत्त’ला सलग दुसऱ्या वर्षी ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर

आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने ‘सूर्यदत्त’चा ३० रोजी होणार गौरव

पुणे : आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट (IMC RBNQA) ने 2021 साठीच्या गुणवत्ता पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात पुण्यातील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशनला शैक्षणिक वर्गवारीत प्रतिष्ठेचा ‘आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीचा माईलस्टोन मेरिट रिकगनेशन सन्मानही संस्थेला मिळाला होता.

‘सूर्यदत्त’सोबत अन्य दोन शैक्षणिक संस्था आणि आठ कॉर्पोरेट्सनी या पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळविले आहे. ‘सूर्यदत्त’सह एस.एम.शेट्टी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, मुंबई या महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक संस्थेचा समावेश आहे.

जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांना ‘जुरान क्वालिटी मेडल’ने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या ३० एप्रिल २०२२ रोजी मुंबईत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जुझार खोराकीवाला, ट्रस्टचे अध्यक्ष नीरज बजाज आणि मेरिको लि. चे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अनंत सिंघानिया अध्यक्ष आयएमसी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

आयएमसी रामकृष्ण बजाज नॅशनल क्वालिटी अवार्ड ट्रस्ट ही मुंबईतील नामवंत संस्था असून गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी संस्थांना मार्गदर्शन करण्यात अग्रेसर आहे. ट्रस्टतर्फे दिले जाणारे पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचे असून पुरस्कारार्थींना देशात गौरवाचे स्थान प्रदान करणारे आहेत. संस्थात्मक गुणवत्ता साधण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन रुजविण्यासाठी ट्रस्ट प्रोत्साहन देते. या पुरस्कारांसाठीच्या निवडप्रक्रियेचे चार टप्पे असून ती चार महिने चालते. नेतृत्त्व, रणनीतीचे नियोजन, ग्राहक केंद्रिता, मोजमाप, विश्लेषण आणि ज्ञान व्यवस्थापन, मनुष्यबळ व्यवस्थापन, कार्यान्वयनावरील लक्ष आणि अंतिम परिणाम या घटकांच्या आधारे या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते.

आयएमसीच्या अनुभवसिद्ध तज्ज्ञांकरवी या पुरस्कारांसाठीची निवडप्रक्रिया पार पाडली जाते. आयएमसी रामकृष्ण बजाज राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार गौरव प्रमाणपत्र सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना प्रदान करण्यात येणार आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स गेल्या दोन दशकांपासून अधिक विद्यार्थ्यांना माफक फीमध्ये सर्वांगीण, गुणवत्तापूर्ण विकासाकरिता शिक्षण मिळावे, यासाठी अविरत कष्ट घेत आहे. विविध विषयांच्या शिक्षणासोबतच मूल्याधारित पद्धती, जगप्रसिद्ध विद्यापीठे/संस्थांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही येथे चालविले जातात. विद्यार्थी केवळ नोकरीसाठी तयार व्हावेत इतका मर्यादित उद्देश न ठेवता त्यांना स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी संस्था झटते आहे. सूर्यदत्त फाउंडेशनच्या या शैक्षणिक संकुलात सीबीएसई शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, यांच्यासोबतच व्यवसाय व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षितता, हॉटेल व्यवस्थापन, फिजियोथेरपी, इंग्रजी आणि परकीय भाषा, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, अॅनिमेशन, इव्हेंट मॅनेजमेंट, दृक-श्राव्य कला या विद्याशाखांचे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. येथे देश विदेशातील विद्यार्थी अभिमानाने शिक्षण घेत आहेत.

सूर्यदत्तचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे शिक्षण क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तिमत्त्व आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरींगमधून मेकॅनिकल इंजिनियरींगमधील पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मार्केटींग व्यवस्थापन, मटेरियल्स व्यवस्थापन, इंडस्ट्रियल व्यवस्थापन, ऑपरेशन व्यवस्थापन, आणि मनुष्यबळ व्यवस्थापन या विषयांत मास्टर्स पदवी मिळवली आहे . त्यांनी पर्यावरण या विषयात पीएचडी मिळवली आहे . त्यांच्या व्यापक शैक्षणिक आणि औद्योगिक अनुभवाचा लाभ अनेक संस्थांनी घेतला. ते एसएमई चेंबर ऑफ कॉमर्स – पुणे चे अध्यक्ष होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी कच्च्या मालाच्या व्यवस्थापनासंदर्भात भारत सरकारच्या स्टील व उद्योग मंत्रालयाने बनवलेल्या महत्त्वाच्या समितीचेही ते सदस्य होते. इएसपीआय, दिल्लीचेही ते आश्रयदाते सभासद आहेत. संसद स्थायी मंडळाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सचेही ते सदस्य तसेच टेलिफोन सल्लागार समिती, पुणेचेही ते सदस्य होते. उच्चशिक्षणातील विविध प्रयोगांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक परदेशी विद्यापीठांना भेटी दिल्या. शिक्षण, अध्यात्म आणि जागतिक शांततेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांची नुकतीच ‘सीईजीआर’च्या उपाध्यक्षपदी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या मंडळ सदस्यपदी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या यशाबद्दल सूर्यदत्त परिवारातील सर्वांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणारे उद्योजक आणि संस्थेच्या अन्य घटकांप्रती मनापासून आभार व्यक्त केले.
………..
या संस्थांचा होणार सन्मान
• ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल अहमदाबाद
• अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.,
• वेदांता लि., ओडिसा आणि गोवा
• सिटीयस टेक हेल्थकेअर टेकनॉलॉजि प्रा. लि मुंबई
• शक्ती पंम्प्स लि., पीठमपुर
• कावेरी हॉस्पिटल-सालेम
• ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल अबुधाबी
• भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. कोची

Leave a Reply

Your email address will not be published.