‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीवर सीए चंद्रशेखर चितळे यांची फेरनिवड

‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीवर सीए चंद्रशेखर चितळे यांची फेरनिवड

प्रादेशिक समितीच्या सदस्यपदी सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे यांची निवड

पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) केंद्रीय समितीच्या सदस्यपदी (सेंट्रल कौन्सिल मेम्बर – सीसीएम) पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची फेरनिवड झाली आहे. प्रादेशिक समितीचे सदस्य (रिजनल कौन्सिल मेंबर-आरसीएम) म्हणून सीए ऋता चितळे यांची प्रथमच, तर सीए यशवंत कासार यांची फेरनिवड झाली आहे. पुणे शाखेतून एक सीसीएम आणि दोन आरसीएम निवडून आले, ही आनंदाची बाब आहे.

२५ व्या सेंट्रल कौन्सिलसाठी व २४ व्या रिजनल कौन्सिलसाठीची निवडणूक नुकतीच झाली. ही निवड २०२२-२०२५ या कालावधीत पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुणे आयसीएआयच्या वतीने पुणे आयसीएआयचे चेअरमन व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पठारे यांनी अभिनंदन केले.

‘आरसीएम’ पश्चिम विभागासाठी पुण्यातील १०५०० सीए व २२ हजार सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणार आहेत. १९६२ मध्ये सुरु झालेली पुणे शाखा भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा आहे. पश्चिम विभागात पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, गोवा, बडोदा आदी शाखांचा समावेश आहे. केंद्रीय स्तरावर सीए व्यावसायिकांसाठी चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे चितळे यांनी नमूद केले. ऋता चितळे, यशवंत कासार यांनीही आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सीएंसाठी भरीव काम करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *