पिंपरी, दि. २२ – मुंबई पाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना व्हायरसचा रुग्ण ( Corona virus patient in Pimpri-Chinchwad city) आढळून आला आहे. त्या रुग्णाला ताप आला म्हणून त्यांनी कोविड टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे. ४२ वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने आता खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
या वर्षातील पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आलेला हा पहिलाच कोरोना रुग्ण आहे. कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. राज्याच्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे सामान्य लोकांनीही अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. वेळोवेळी आपले हात धुवावेत आणि डोळ्यांना, नाकाला वारंवार हात लावणं टाळावं. असे आवाहन केले आहे.
दरम्यान, महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून शहरातील नागरिकांनी घाबरुन जावू नये. कोविड पॉझिटिव्ह आलेला रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत. त्याची तब्येत देखील ठीक आहे. मात्र, कोणी घाबरून जाऊ नये असंही आरोग्य विभागाचे डॉ लक्ष्मण गोफणे यांनी स्पष्ट केलं आहे.