विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ रोजी मेळावा

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थ्यांचा २७ रोजी मेळावा

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीच्या (Vidyarthi Sahayyak Samiti) माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ३३ वा स्नेहमेळावा (Get Together) येत्या रविवारी (दि. २७ फेब्रुवारी २०२२) आयोजिला आहे. माजी विद्यार्थी मंडळाच्या (Maji Vidyarthi Mandal) वतीने रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत शिवाजी हौसिंग सोसायटी येथील समितीच्या लजपतराय विद्यार्थी भवन (Lajpatrai Vidyarthi Bhavan) वसतिगृहात हा मेळावा होत असून, यंदा मेळाव्याचे प्रायोजकत्व सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांकडे आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी मंडळाचे कार्यवाह सुनील चोरे (Sunil Chore) व मेळावा समन्वयक नंदकुमार तळेकर (Nandkumar Talekar) यांनी दिली.
 
ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि मुंबई येथील जीएसटी उपायुक्त गणपत (अण्णा) वावरे हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त रमाकांत तांबोळी, मंडळाचे अध्यक्ष राजू इंगळे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्ता, देणगीदार व कर्मचारी यांचा सन्मान, विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान, कार्यपरिचय यासह गप्पा-गोष्टी, विचार विनिमय व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अधिकाधिक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मेळाव्यात सहभागी होण्याचे, तसेच अधिक माहितीसाठी नंदकुमार तळेकर (९९२२४४४४२८), मनीषा गोसावी (९९२३४६२४४९), गणेश काळे (९८२२७७८३२६), गणेश ननावरे (८३८०८५१७३०) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व हुशार विद्यार्थ्यांची अल्पदरात भोजन व निवासाची सोय व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, या उद्देशाने गेली ६७ वर्षे विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे ही संस्था काम करते. येथून बाहेर पडलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पुन्हा संस्थेत योगदान द्यावे, संस्थेशी संलग्नित राहून आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, या निमित्ताने असे मेळावे उपयुक्त ठरतात, असे मंडळाच्या वतीने नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *