महायुतीचे शेखर निकम सोमवारी उमेदवारी अर्ज  करणार दाखल

महायुतीचे शेखर निकम सोमवारी उमेदवारी अर्ज करणार दाखल

चिपळूण : २६५ चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार शेखर निकम हे आपला उमेदवारी अर्ज लवकरच दाखल करणार असून यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सोमवार (दि.२८) रोजी स.१०:३० वा. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेतेमंडळींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्यासाठी विद्यमान आमदार शेखर निकम आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आपल्या मतदारसंघातील कोकणवासीयांसाठी आजपर्यंत केलेल्या कामांची पोचपावती म्हणून मतदार पुन्हा एकदा आपल्याला निवडून देतील हा आत्मविश्वास निकम यांना निश्चितच आहे. काहीही झालं तरी कोकणचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा प्रणच निकम यांनी केला आहे. मतदारांची साथ आणि कार्यकर्त्यांचा उत्साह या बळावर ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शेखर निकम सज्ज झाले आहेत.

तूर्तास अर्ज दाखल करण्याची निकम यांची पूर्ण तयारी झाली असून लवकरच प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. कार्यकर्ते मात्र आतापासूनच आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *