बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे प्रतिपादन; मृणाल वानखेडे, श्रद्धा झिंजुरके यांना ‘बंधुताभूषण पुरस्कार’ प्रदान
पुणे : “प्रशासकीय सेवा, चित्रपटांच्या माध्यमातून समाज परिवर्तन करता येते. आमिष दाखवणारी ही दोन्ही क्षेत्रे आहेत. मात्र, आपल्यातील विवेक, बंधुतेचा विचार जागृत ठेवून चारित्र्य जपावे आणि समाजहिताचे काम करावे. पैशांच्या मागे न धावत उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघत त्यातील चांगले वेचून घ्यावे. आपल्याला घडवणाऱ्या समाजाप्रती कायम कृतज्ञतेची भावना ठेवावी. चांगल्या मार्गाने मिळालेला पैसा आत्मिक समाधान देतो,” असे प्रतिपादन बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केले.
श्रद्धा झिंजुरके म्हणाल्या, “स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळालेल्या यशात कुटुंबीयांचा, बंधुता परिवाराचा मोठा वाटा आहे. या प्रवासात अनेकदा चढउतार येतात. मात्र, चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात. समाजसेवा करण्याची संधी मिळाली असून, शिक्षण क्षेत्रासाठी आणि समाजासाठी चांगले योगदान देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”
रामदेव सित्रे (अमरावती), सुनीता कावसनकर (छत्रपती संभाजीनगर), मधुराणी बनसोड (वाशीम), सुमन आव्हाड (पुणे), सतीश मालवे (अमरावती), विजय जाधव (शिक्रापूर), करुणा कंद (उरुळी कांचन), चंदन तरवडे (कोपरगाव), संगीता गव्हाणे (पुणे), विद्या अटक (पुणे), सविता कुंजीर (पुणे) यांना बंधुता मायमराठी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.