महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आयोजित शिबिरात ५२ जणांचे रक्तदान

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आयोजित शिबिरात ५२ जणांचे रक्तदान

डॉ. विकास आबनावे यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

पुणे : महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव दिवंगत डॉ. विकास मारुतराव आबनावे यांच्या ६३ व्या जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ५२ जणांनी रक्तदान केले. त्यातील २९ जणांनी प्रथमच रक्तदान करण्याचा अनुभव घेतला.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार, संस्थेचे मानद अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, ‘रक्ताचे नाते’चे राम बांगड, संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार व युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे आदी उपस्थित होते.

संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत के.ई.एम. रुग्णालयाच्या ब्लड बँक आणि रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने हे शिबीर झाले. संस्थेच्या सभासदांसह, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, कुटूंबीय आणि मित्रपरिवारातील अनेकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, असे प्रसाद आबनावे यांनी सांगितले.

डॉ. विकास आबनावे यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी अभिवादन सभा झाली. यावेळी सकाळी संस्थेच्या सर्व शाखांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवाराने डॉ. आबनावे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, राजेंद्र पंढरपूरे यांनी आबनावे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *