अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव घुले यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

अजित पवार यांच्या उपस्थितीत गौरव घुले यांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बिबवेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गौरव गणेश घुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

अजित पवार यांनी गौरव गणेश घुले यांच्या कार्याचे कौतुक करत या युवा कार्यकर्त्यांच्या फळीमुळे राष्ट्रवादी पक्ष अधिक सक्षम होईल. या भागातील नागरिकांच्या समस्यांची जाण गौरव घुले यांना असल्याने येथील विकासकामे करण्यास त्यांचा सहभाग महत्वाचा राहील, असे त्यांनी सांगितले.

बिबवेवाडी व बालाजीनगरच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देशाचे आदरणीय नेते शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आगामी काळात बालाजीनगर आणि परिसरात समाजकारण आणि राजकारण यांचा उत्तम संयोग साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावून समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाला विचारत घेऊन काम करायचे आहे. आगामी पालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकणार याचा मला विश्वास आहे,” असे गौरव घुले यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *