आयसीएआय अध्यक्षपदी डॉ. मित्रा यांची निवड

आयसीएआय अध्यक्षपदी डॉ. मित्रा यांची निवड

पुणे : कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या वतीने २०२२-२३ या कालावधीसाठी नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. देबाशिस मित्रा (सीए) यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर अनिकेत सुनील तलाठी (सीए) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ।

कौन्सिलमध्ये एकूण ४० सदस्य असतात, ज्यापैकी ३२ सनदी लेखापालांद्वारे निवडले जातात, तर उर्वरित ८ केंद्र सरकारद्वारे नामनिर्देशित केले जातात. सन १९४९ मध्ये संसदेच्या कायद्याने स्थापन झालेल्या भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था जागतिक दर्जाची संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. आयसीएआय, डब्लूआयआरसी, पुणे शाखेचे अध्यक्ष समीर लड्डा (सीए), उपाध्यक्ष काशिनाथ पठारे (सीए) यांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन केले.