अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

पुणे: पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या लहानग्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर हा मुलगा पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना सापडला. 

मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. खूप गुप्तपणे हा तपास सुरू होता.अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.

चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.