रोटरीच्या वतीने फुरसुंगी कचरा डेपोतील कर्मचाऱ्याचा सत्कार.

रोटरीच्या वतीने फुरसुंगी कचरा डेपोतील कर्मचाऱ्याचा सत्कार.

रोटरी प्रांत ३१३१च्या व्होकेशनल विभागातर्फे देवाची ऊरुळी-फुरसुंगी येथील कचरा डेपोत काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आले. पुष्पगुच्छ,किराणा किट,व स्मृतीचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. कचरा डेपो येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल पंकज शहा,व्होकेशनल विभाग डायरेक्टर अजय वाघ,कार्यकारी अभियंता घनकचरा विभाग प्रसाद जगताप,कनिष्ठ अभियंता राजेंद्र तिडके,सहाय्यक प्रांतपाल सूर्यकांत चौधरी,अनंत तिकोणे,पब्लिक इमेज डायरेक्टर क्रांती शहा,रोटरी क्लब मागरपट्टाचे अध्यक्ष रवी मिश्रा,रोटरी क्लब लोकमान्यनगरचे अध्यक्ष रवींद्र पाटील,रोटरी क्लब विजडमचे अध्यक्ष हेमंत पुराणिक,रोटरी कॅम्पचे अध्यक्ष सचिन परमार आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध रोटरी क्लब पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना पंकज शहा यांनी मुंबईचे डबेवाले यांच्या प्रमाणेच येथील कामगारांचेही कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचे सादरीकरण झाले पाहिजे,व यासाठी आवश्यक ती मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला. राजेंद्र तिडके यांनी बोलताना पूर्वीचा कचरा डेपो आणि आताचा यात खूप फरक आहे.प्रक्रिया केल्याने येथील परिस्थितीत खूप सुधारणा झाली आहे. असे संगितले.अजय वाघ यांनी बोलताना येथील कर्मचारी हे खरे आरोग्य दूत असल्याचे संगितले.येथील कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी सोरोक्लिनिक डायग्नोस्टिक सेंटरच्यावतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *