प्रदीप वाल्हेकर यांची माहिती; बिल्डर्स असोसिएशनकडून दरवाढीचे आश्वासन
पुणे : खडी, क्रश, सॅंड, सिमेंट दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रेडी मिक्स काँक्रीटच्या (आरएमसी) दरातही वाढ करण्याच्या आश्वासनानंतर पुणे आरएमसी असोसिएशनने आरएमसी प्लांट मालकांचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट मालकांच्या एकीमुळे हे शक्य झाले असल्याचे वाल्हेकर यांनी नमूद केले.

या संदर्भात शनिवारी झालेल्या बैठकीत पुणे आरमसी असोसिएशनच्या वतीने सर्व आरएमसी प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून आरएमसी एम-२० ग्रेड काँक्रिटचा दर रुपये ५,३०० प्रती क्युबिक मीटर ठरविण्यात आला आहे. या बैठकीसाठी आरएमसी असोसिएशनचे सर्व सभासद हजर होते. असोसिएशनतर्फे तानाजी वाघोले, चैतन्य रायसोनी, नरेंद्र पासलकर, मच्छिंद्र सातव, संदिप काळोखे, विक्रम धुत, नरेंद्र महाजन, युसुफ इनामदार व सचिन काटे यांनी सदर वाढीसाठी अथक परिश्रम घेतले.