गुवाहाटीत आज RR vs RCB हाय-व्होल्टेज सामना; पावसाची शक्यता कमी

गुवाहाटीत आज RR vs RCB हाय-व्होल्टेज सामना; पावसाची शक्यता कमी

RR vs RCB Weather Update : आयपीएल २०२६ मध्ये आजचा सामना रंगणार आहे, ज्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आमनेसामने येणार आहेत. गुवाहाटीतील बसरापारा क्रिकेट स्टेडियम येथे हा हाय-व्होल्टेज सामना पार पडणार आहे.
याआधी याच मैदानावर राजस्थानचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध झाला होता, मात्र पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला आणि अखेरीस ११-११ षटकांचा सामना खेळवावा लागला. त्यामुळे आजच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर हवामान हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.
हवामानाचा अंदाज काय सांगतो?
आज गुवाहाटीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वीच पाऊस होईल आणि खेळाच्या वेळेत वातावरण स्वच्छ राहील, असा अंदाज आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता केवळ ३% इतकी आहे. त्यामुळे पूर्ण २०-२० षटकांचा सामना होण्याची दाट शक्यता आहे.
हाय-व्होल्टेज लढत निश्चित
दोन्ही संघ अजूनपर्यंत या हंगामात अपराजित आहेत. त्यामुळे आज कोणत्या ना कोणत्या संघाला पहिला पराभव स्वीकारावा लागणार हे निश्चित आहे. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी ही युवा जोडी धडाकेबाज कामगिरी करताना दिसू शकते. तर बंगळुरूकडून विराट कोहली आणि टीम डेव्हिड यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
संभाव्य प्लेइंग ११
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टीम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रोमारिओ शेफर्ड, कुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग, जेकब डफी, सुयश शर्मा.
राजस्थान रॉयल्स:
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, रवी बिश्नोई.
एकूणच, हवामानाचा अडथळा कमी असल्याने क्रिकेट चाहत्यांना आज एक रोमांचक आणि पूर्ण सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.