
शोजो अँडो म्हणाले, “कंपनीने सादर केलेली रूम एसी श्रेणी ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएंसीच्या २०२६ स्टार रेटिंग मानकांनुसार विकसित करण्यात आली असून, ती ‘रिस्पॉन्सिबल कुलिंग’ या संकल्पनेवर आधारित आहे. या एसींमध्ये पेटंटेड स्ट्रीमर डिस्चार्ज तंत्रज्ञानाद्वारे हवा शुद्धीकरण, कार्यक्षम स्विंग कॉम्प्रेशर, स्मार्ट आयओटी कनेक्टिव्हिटी, डीएनएनएस अँटी-कॉरोजन कोटिंग आणि ५४ अंश सेल्सिअस तापमानातही प्रभावी कूलिंग देणारे हाय-अँबियंट परफॉर्मन्स तंत्रज्ञान यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
या श्रेणीत ५-स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शांत कार्यप्रणाली, जलद कूलिंग आणि लक्षणीय वीज बचत ही या मॉडेल्सची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे प्रीमियम शहरी ग्राहकांसोबतच प्रथमच एसी खरेदी करणाऱ्यांसाठीही ही श्रेणी आकर्षक पर्याय ठरणार आहे. व्यावसायिक आणि उच्च-स्तरीय निवासी प्रकल्पांसाठी सादर करण्यात आलेली ‘व्हीआरव्ही अल्फा’ सिरीज ही एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली हवामानातील बदल ओळखून स्वतःचे कार्य समायोजित करते आणि सर्वोत्तम कामगिरी साध्य करते. त्यामुळे ऊर्जा बचत आणि वापरकर्त्याचा आराम या दोन्ही बाबींमध्ये सुधारणा होते. आधुनिक पायाभूत सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली ही प्रणाली कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमतेवर भर देते, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक आणि ऊर्जा कार्यक्षम उत्पादने देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. ६० हून अधिक मॉडेल्स असलेली २०२६ ची श्रेणी जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांचा उत्तम संगम आहे. कंपनीच्या तीन उत्पादन युनिट्समुळे उद्योगातील स्थान अधिक बळकट होत असून, पर्यावरणपूरक एअर-कंडिशनिंग सोल्यूशन्सची वाढती मागणी पूर्ण करण्यात मदत होत आहे, असे संजय गोयल यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील खर्चामुळे कंपनी एप्रिल २०२६ पासून उत्पादनांच्या किमतीत ७ ते १२ टक्क्यांनी वाढ करणार असल्याची माहिती देण्यात आली.
– विजेची मोठी बचत करणारे तंत्रज्ञान
– उत्कृष्ट कूलिंग
– हवामानानुसार टिकणारी कामगिरी
– गरजेनुसार वाढवता येणारी आणि -शक्तिशाली यंत्रणा.
– क्लाउड आधारित एआय (AI) सोल्यूशन
डायकिन इंडियाविषयी:
– भारतातील गुंतवणूक: २८०० कोटी रुपये
– उत्पादन प्रकल्प: नीमराना आणि श्री सिटी
– तीन अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्रे
– एक ‘डीजीआयएमई’ आणि दोन ‘एसीडीसी’
– ‘डायकिन-रेची’ संयुक्त भागीदारी
– नेका’ पुरस्कार २०२५ चे विजेते
