फुले दांपत्य भारतीय स्त्रीवादाचे जनक: संगीता झिंजुरके

फुले दांपत्य भारतीय स्त्रीवादाचे जनक: संगीता झिंजुरके

 
संविधान दिनानिमित्त एक दिवसीय ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ महाकाव्य संमेलनाचे उद्घाटन
 
पुणे, दि. २६ – “सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करून स्त्रीजातीचा उद्धार केला. जात-धर्मापलीकडे जाऊन प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारे फुले दाम्पत्य भारतीय स्त्रीवादाची जनक आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री संगीता झिंजुरके यांनी केले.(“The Phule couple, who transcended caste and religion and led us on the path of progress, are the fathers of Indian feminism,” asserted veteran poet Sangeeta Zhinjurke.)
 
विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समिती, काषाय प्रकाशन आणि बंधुता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या मायलेकी’ या महाकाव्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी संगीता झिंजुरके संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होत्या.  (Sangeeta Zhinjurke was speaking as the conference president at the inauguration of the epic poetry conference titled ‘We Are Savitri’s Friends’.)   नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवियित्री प्रा. डॉ. सविता पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी विश्वबंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष सीमा गांधी, प्रा. भारती जाधव, पौर्णिमा वानखेडे आणि प्रा. सायली गोसावी आदी उपस्थित होते.
 
(Sangita zinjurke said )संगीता झिंजुरके म्हणाल्या, “सावित्रीबाईंच्या साहित्यामधून स्त्रीच्या उद्धारासाठी फुले दाम्पत्याने केलेले कार्य अधोरेखित होते. त्यांनी दिलेला विचार, संविधानाचे कवच यामुळे आज स्त्रीला स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळत आहे. अनेक क्षेत्रात ती उंच भरारी घेत आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे. स्त्री ही परिवर्तनाची वाहक असल्याने तिने विवेकी राहत परिवर्तनाचा विचार अंगिकारला पाहिजे. संविधानाच्या मार्गावर चालायला हवे.”
 
(Prof. Dr. Savita patil said )प्रा. डॉ. सविता पाटील म्हणाल्या, “बाईमाणूस मिळालेल्या संधीचे सोने करत असते. संधी मिळण्यासाठी संघटित असणे महत्त्वाचे आहे. समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी स्त्रीवादाचा विचार मोलाचा आहे. स्त्री शिकली, तर दोन कुटूंब सुधारत असते. सावित्रीबाईंचा त्याग, त्यांनी असंख्य समस्यांना दिलेले तोंड यामुळेच आजची स्त्री मुख्य प्रवाहात मुक्तपणे वावर करू शकत आहेत.” 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले साहित्य पुरस्कार डॉ. संगीता शिंदे, रंजना बोरा, शशिकला गुंजाळ, निर्मला शेवाळे, शरयू पवार, पंचवटी गोंदले, जयश्री श्रोत्रीय, जया राव, आरती डोंगरे, प्रतिमा साळुंखे, रेवती साळुंखे यांना, तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मुस्कान इब्राहिम, देवश्री लव्हे, शुभांगी जाधव, वैष्णवी भोसले, कावेरी कोळी, मानसी तटकरे, दीपाली पुजारी, संध्या बल्लाळ, साक्षी नारायण, रसिका सणस यांना प्रदान करण्यात आला. 

 
संमेलनाचे सुरुवात बंधुता गीत व दीपप्रज्वलनाने झाली. सीमा गांधी यांनी स्वागत केले. प्रा. भारती जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा वानखेडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *