जागतिक योग दिनी अनोख्या विश्वविक्रमी ‘ताल आरोग्यम योगथॉन २०२२’चे आयोजन

जागतिक योग दिनी अनोख्या विश्वविक्रमी ‘ताल आरोग्यम योगथॉन २०२२’चे आयोजन

सलग तीन तास ३३०० लोक तबल्याच्या, संगीताच्या तालावर करणार योग शालेय ते पीएचडीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी होणार सहभागी

पुणे : आठव्या जागतिक योग दिनानिमित्त (दि. २१ जून) सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘ताल आरोग्यम योगथॉन २०२२’चे आयोजन केले आहे. सलग तीन तास ३०० स्टाफ व ३००० विद्यार्थी तबल्याच्या, संगीताच्या तालावर तालयोग करणार आहेत. मानवता आणि सर्वांगीण विकासासाठी शरीर आणि मनाचा समतोल साधणाऱ्या या अनोख्या ‘ताल आरोग्यम योगथॉन’ची विश्वविक्रमी नोंद होणार आहे. यंदा आयुष मंत्रालयाने ‘मानवतेसाठी योग’ अशी संकल्पना राबविली आहे.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मंगळवार, दि. २१ जून २०२२ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून या योगथॉनला सुरुवात होणार आहे. संगीताच्या तालावर सर्वाधिक वेळ, सर्वाधिक लोकांनी योग करण्याचा हा विक्रम असणार आहे. ३०० स्टाफ आणि ३००० विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. शालेय ते पीएचडीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे. योग आणि स्वास्थ्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. तबला वादक आणि योगाचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.

ताल आरोग्यम योगथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असून, पहिल्या पाच विजेत्यांना १० हजार, आठ हजार, सहा हजार, चार हजार व दोन हजार अशी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. या कार्यक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक्समध्ये होणार असून, ‘सूर्यदत्त’च्या फेसबुक पेज व युट्युब चॅनेलवरून लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे. https://facebook.com/Suryadatta group of institutes आणि https://www.youtube.com/Suryadatta Group of Institutes SGI या लिंकवर पाहता येईल.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वात हा उपक्रम आयोजिला आहे. याविषयी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “प्रत्येकाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अतिशय महत्वाचा आहे. शरीर आणि मनाचे कार्य सुरळीत राहण्यासाठी, तसेच  शरीर, आत्मा आणि मन यांचा समतोल राखण्यासाठी योग उपयुक्त आहे. नियमित योगाभ्यासाने अनेक आजारांवर मात करता येते. लवचिकता, मेंदूची कार्यक्षमता आणि एकंदर आरोग्य सदृढ होण्यासाठी योग उपयुक्त ठरतो. कोरोनामुळे मानसिक आजाराचे प्रमाण वाढले असून, यावर योग उपायकारक ठरत आहे. गेल्या वेळी ‘सूर्यदत्त’मध्ये ‘कलाआरोग्यम योगथॉन’ घेण्यात आली होती. त्या उपक्रमाची दाखल जागतिक स्तरावरील अनेक संस्थांनी घेत त्याचे विक्रम नोंदवले होते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *