उमिया मोबाईल शॉपीचे पुण्यातील पहिले भव्य दालन हडपसरमध्ये

उमिया मोबाईल शॉपीचे पुण्यातील पहिले भव्य दालन हडपसरमध्ये

उमिया मोबाईलच्या पहिल्या भव्य दालनाचे 
आकर्षक ऑफर्ससह हडपसरमध्ये उद्घाटन
 
पुणे: मोबाईल व ऍक्सेसरीजच्या बाजारातील अग्रणी उमिया मोबाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या भव्य मोबाईल रिटेल दालनाचे उद्घाटन हडपसरमध्ये रविवारी झाले. उमिया मोबाईलचे पुण्यातील हे पहिलेच दालन असून, येथे ग्राहकांना सर्व कंपन्यांचे मोबाईल, ऍक्सेसरीज व अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे आकर्षक किंमतीत व ऑफर्समध्ये एकाच छताखाली उपलब्ध झाले आहेत. सोलापूर रस्त्यावरील हडपसर गाडीतळ येथे भव्य १५०० स्क्वेअर फुटमध्ये दुमजली हे दालन आहे.
 
सॅमसंगचे विभागीय विक्री व्यवस्थापक सत्यजित पुरी, विपणन व्यवस्थापक रोहित बर्थरे, वितरण प्रमुख विशाल माहेश्वरी, उमिया मोबाईलचे संचालक गिरीश पटेल, किशोर पटेल, बन्नी पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सोमाणी, बिझनेस हेड चंद्र मोहन आदी उपस्थित होते. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमिया मोबाईलच्या या दालनात भरघोस सवलतींचा लाभ घेत मनसोक्त खरेदी केली. विविध ऑफर्स आणि आकर्षक भेटवस्तू यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावरील खरेदीचा आनंद पाहायला मिळत होता.
 
अमित सोमाणी म्हणाले, “उमिया मोबाईल गुजरातमधील आघाडीची मोबाईल व ऍक्सेसरीज विक्रेता कंपनी आहे. ‘उमिया’ने आपले पुण्यातील पहिले दालन हडपसर येथे सुरु केले असून, पुणेकरांना सर्वोत्तम दर्जाचे मोबाईल्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दालनांची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात उमिया मोबाईलने ५० पेक्षा अधिक दालनातून ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविली आहे. ग्राहकांचा हाच विश्वास आम्हाला व्यावसायिक प्रगतीसाठी ऊर्जादायी ठरत आहे.”
 
“उमिया मोबाईल ही भारतभरात झपाट्याने विकसित होत असलेली मोबाईल रिटेल चेन आहे. मोबाईल व एक्सेसरीजसाठी पुण्याची बाजारपेठ खूप मोठी असून, येथील ग्राहक चोखंदळ आहे. त्यांना चांगल्या प्रतीचे मोबाईल्स, ऍक्सेसरीज, टॅबलेट, स्मार्टवॉच, टीव्ही, होम अप्लायन्सेस यासह इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने पुरविण्यावर आमचा भर आहे. अतिशय देखण्या व भव्य दालनात या सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहेत. लवकरच आणखी काही शाखा सुरु करण्याचा आमचा विचार असून, दिवाळीपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ९ शाखा सुरु होतील,” असे चंद्र मोहन यांनी नमूद केले.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *