गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी मिळण्याची गरज
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची पत्रकार परिषदेत माहिती; सूर्यदत्त ग्लोबल स्कुल ऑफ फ्युचरची स्था पना
पुणे : भारतीय मूल्ये, संस्कृती परंपरा आणि तत्वज्ञानाला अनुसरून वैश्विक मानांकनानुसार विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळावे, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘स्कुल ऑफ फ्युचर’ शिक्षणपद्धती लागू करण्यात येणार आहे. यासाठी सूर्यदत्त ग्लोबल स्कुल ऑफ फ्युचरची (एसजीएसएफ) स्थापना करण्यात आल्याची माहिती सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकरी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते. सिद्धांत चोरडिया यांनी नुकताच फिनलँड येथे अभ्यासदौरा केला होता. यावेळी फिनलँडच्या शिक्षण मंत्र्यांशी यासंदर्भात
सिद्धांत चोरडिया म्हणाले, “शालेय स्तरावर याची सुरुवात करण्यात येणार आहे. कालांतराने उच्च शिक्षणासाठी ही शिक्षण पद्धती लागू केली जाईल. स्कुल ऑफ फ्युचर ही फिनिश शाळा पद्धती आहे. यामध्ये अभिनव अध्यापन पद्धती, अभ्यासक्रम विकास, शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक तंत्रज्ञान एकत्रीकरण, प्रात्यक्षिक अनुभव आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. या शाळेत अनुभवात्मक शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण मिळवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्ञान आत्मसात करताना शिकण्याचा आनंद घेता येतो. कोणत्याही प्रमाणित चाचणीशिवाय, ही शाळा प्रणाली स्पर्धेपेक्षा सहकार्य आणि विद्यार्थी-शिक्षक परस्परसंवादाला अधिक प्रोत्साहन देते.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जागतिक स्तरावर प्रायोगिक आणि प्रात्यक्षिक शिक्षणामुळे शिक्षणाचे ध्येय ज्ञान देण्याकडे सरकत असल्याचे दिसते. याआधीच्या शिकवण्याच्या पद्धती दीर्घकालीन परिणामकारक अशा नाहीत. शाळा आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था अलीकडे नाविन्यपूर्ण, धोरणात्मक आणि कल्पक, कौशल्याधारीत शिक्षण पद्धतीला प्राधान्य देत आहेत. परीक्षा आणि नीरस व्याख्यानांऐवजी सारांशात्मक मूल्यांकनावर भर दिला जात आहे. शैक्षणिक विषय वास्तविक जीवनाशी जोडलेले आहेत. स्कूल ऑफ फ्युचरमध्ये, विद्यार्थी शिकण्याच्या चक्राच्या केंद्रस्थानी असून, अभ्यासक्रमाची चौकट शिक्षकांना विषयांमध्ये त्यांचा ग्रेड स्तर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शन करते. येथे शिक्षणाला चाचणीपेक्षा प्राधान्य दिले जाते. सर्व व्यक्तींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे. शिकणारा हा बदलाच्या केंद्रस्थानी असतो आणि शिकण्याचे उद्दिष्ट्य शिक्षक, पाठ्यपुस्तके, शिकवणी यापेक्षा विद्यार्थी केंद्रित असतात. व्यक्तिगत शिक्षणावर भर दिला जातो. सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण, समान शुल्क व समान संधी मिळण्याची आज काळाची गरज आहे.”
——————–
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, यावर आपण लक्ष द्यायला हवे. अनावश्यक फटाके फोडून वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण टाळावे. प्लास्टिकचे पॅकिंग वापरू नये. सर्वांना उपयोगी अशा भेटवस्तू म्हणून द्यायला हव्यात. जेणेकरून दिवाळीचा सण नातलग, मित्रमंडळी, सहकारी यांच्यासोबत साजरा होईल. पण अनावश्यक खर्चाची बचत, पर्यावरण संवर्धन या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
—————————
फोटो ओळ :
भांडारकर रस्ता : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आयोजित पत्रकार परिषद व दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात बोलताना सिद्धांत चोरडिया. प्रसंगी डावीकडून सुषमा चोरडिया, प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व प्रशांत पितालिया.