दलित पँथर चा चेहरा हा अन्यायाचा प्रतिकार करणारा चेहरा आहे –  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

दलित पँथर चा चेहरा हा अन्यायाचा प्रतिकार करणारा चेहरा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

माता शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचा शंभराव्या वाढदिवसानिमित्त हृदय सत्कार सोहळ्यात दलित पँथर च्या आठवणींना उजाळा

पुणे: दलित पँथर चा चेहरा हा अन्यायाचा प्रतिकार करणारा चेहरा आहे. राजा ढाले यांनी दलित पँथर बरखास्त केल्या नंतर औरंगाबाद येथे बैठक घेऊन भारतीय दलित पँथर स्थापन केली. त्याचे पाहिले अध्यक्ष अरुण कृष्णाजी कांबळे होते. हे वर्ष दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यांची आणि माझी मैत्री अतूट होती. त्या मैत्री वर या सुवर्ण महोत्सवी वर्षात रंगभूमीवर नाटक येणार आहे. दलित पँथर च्या इतिहासातील या आठवणींना प्रकाशात आणले पाहिजे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे दलित पँथर च्या जुन्या आठवणींमध्ये रमले. मातोश्री शांताबाई कांबळे यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

माज्या जल्माची चित्तरकथा या आत्मचरित्राच्या लेखिका ;शिक्षिका आणि दलित पँथर चे नेते विचारवंत दिवंगत प्रा.अरुण कांबळे यांच्या मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात भारतरत्न भोमसेन जोशी कलादालनात त्यांचा भव्य हृदय सत्कार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले; माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर ;उपमहापौर सुनीता वाडेकर; साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस आदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शांताबाई कांबळे यांचे पुत्र चंद्रकांत कांबळे;मुलगी गौरी तिरमारे हे आणि सर्व कुटुंबीय उपस्थित होते.

तसेच पँथर अरुण कांबळे आणि रामदास आठवले यांच्या मैत्रीवर नाटक लिहिणारे प्रा. डॉ.अनिल सपकाळ ;डॉ विजय खरे; परशुराम वाडेकर; रिपाइं पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्रचव्हाण;चंद्रकांताताई सोनकांबळे; शशिकलाताई वाघमारे निशा भंडारी; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘ माज्या जल्माची चित्तरकथा ‘ या मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या आत्मचरित्रावर आधारित मराठी मालिका नाजुका दूरदर्शनवर गाजली. माता शांताबाई कांबळे आणि कृष्णाजी कांबळे आबा यांनी आम्हाला पुत्रवत प्रेम दिले.माझे लग्न मातोश्री शांताबाई यांनीच जुळविल्याची आठवण यावेळी ना रामदास आठवले यांनी सांगितली.

यांनी खडतर जीवन कष्ट करून शिक्षण घेऊन आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारधारेच्या मार्गावर त्या जीवन अनुसर करीत आहेत. त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शांताबाई कांबळे यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी गौरव केला.शांताबाई कांबळे यांनी सत्य परखड शब्दांत लिहीलेले वास्तववादी आत्मचरित्र मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरले आहे. केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी नेहमी साहित्यिक कलावंत यांची जाण ठेऊन योग्य वेळी त्यांचे सत्कार केले आहेत.ते सहृदयी नेते आहेत असे डॉ श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.
सर्व वक्त्यांनी ज्येष्ठ लेखिका शिक्षिका शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचा गौरव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *