अंध, अपंग व मूकबधिर भगिनींचे लक्ष्मीपूजन, फराळ वाटप

पुणे: अंध, अपंग व मूकबधिर भगिनींचे लक्ष्मीपूजन करून दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्ट आणि वंदे मातरम् संघटनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला.